Home विदर्भ शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाकडे शासनाचे दूर्लक्ष

शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाकडे शासनाचे दूर्लक्ष

122

मनिष गुडधे.

शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथे प्लान योजने अंतर्गत 86 पदे मंजूर आहेत तसेच नाॅनप्लन अंतर्गत 21 पदे मंजूर असून मागील ऑक्टोबर महिन्यापासून येथील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दोन दोन महिने होत नाहीत त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी तर्फे रोष व्यक्त केला जात असून परिवार सांभाळने कठीण जात आहे.बर्याचस्या अधिकारी व कर्मचारी यांना बॅकेचे हप्ते भरायचे असतात व वेतन वेळेवर होत नसल्याने बॅकेचे व्याज बसत आहे.ह्या बाबतीत तेथील प्राचार्यांना विचारले असता नाॅनप्लन मधील पदांना वेतन अनुदान दर महिन्याला मिळतो पंरतु प्लॅन मधील पदांना वेतन अनुदान दर महिन्याला मिळत नाही त्यांमुळे त्यांचे वेतन दोन ते तीन महिने काढता येत नाही असे सांगण्यात आले तसेच वरिष्ठ कार्यालयात विचारणा केली असता ते सुध्दा केराची टोपली दाखवत आहेत.महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तंत्रनिकेतन मध्ये वेळेवर वेतन होत आहे परंतु फक्त शासकीय तंत्र निकेतन गोंदिया येथेच शासणातर्फे वेतन अनुदान दर महिन्याला दिला जात नसून फक्त तुटपुंजा वेतन अनुदान दिला जातो त्यामुळे त्या तुटपुंज्या अनुदानात केवळ कर्मचारी व काही अधिकारी यांचेच वेतन काढले जाते आणि उरलेल्या अधिकार्यांना मात्र वाट बघावी लागते त्यामुळे एकाच संस्थेतील काहीना वेतन मिळतो तर काहींना उपाशी रहावं लागत आहे.सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून वेतन वेळेवर होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांना परिवार कसे सांभाळायचे अशी चिंता वर्तविली जात आहे. फक्त गोंदियालाच अनुदान का दिला जात नाही असा प्रश्न येथील अधिकारी व कर्मचारी यांना उदभवले आहे व वरिष्ठ कार्यालय तसेच शासण दूर्लक्ष करीत असून कोणाचेही ह्या कडे लक्ष नाही.