घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
कोरोना संसर्ग झालेल्या नागरीक दुखणं अंगावर काढत आहेत. तसेच उशिराने रुग्णालयात पोहोचत असुन ही अतिशय चिंतेची बाब आहे बाधित व्यक्तीवर रुग्णांवर अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार होऊन रुग्ण बरे होऊन घरी जावेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये वाढ करत बेडची क्षमता वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटर अथवा दवाखान्यात आणण्यासाठी प्रशासनाने वाहनाच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे संजीवनी समाधी ध्यान योग पिठ येथे व्यक्त केले.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे डाॅ.योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या पुढाकारातुन स्व. शारदाताई अंकुशराव टोपे कोव्हीड केअर सेंटर 100 खाटांचे उदघाटन राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना टोपे बोलत होते ,यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल,तहसीलदार नरेंद्र देशमुख ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पतंगे , आरोग्य अधिकारी नागेश सावरगावकर, डॉ योगिराज कैलासनाथ महाराज हेमके ,गटविकास अधिकारी रविंद्र जोशी ,मंडळ अधिकारी घनवट,तलाठी अक्षय देशमुख आदीची उपस्थिती होती. कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित असुन प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले वय १८ ते ४५ वर्षावरील लस ऑनलाईन करुन आपला जेव्हा नंबर येईल तेव्हा लस घेण्या साठी जावे याने आपली गैरसोय टाळता येईल ऑनलाईन शिवाय लस मिळणे शक्य नसल्याने केंद्रावर जाऊन गोंधळ निर्माण होता कामा नये यासाठी आपण त्या साईट वर जाऊन ऑनलाईन करूनच लस घेणे बंधनकारक आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये कोरोनाबाधित प्रत्येक रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात येऊन उपचारानंतर प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी गेला पाहिजे. यादृष्टीकोनातुन प्रत्येक रुग्णाला आरोग्याची सेवा अधिक दर्जेदारपणे देण्यात यावी. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये कुठलीही तडजोड स्विकारली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले ताप,सर्दी,खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा नागरिक या गोष्टी अंगावर काढत असल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत व जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी येण्याची गरज पडू नये . यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगीतले ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस जलदगतीने देणार ४५ वर्षावरील वयोगटातील ५ लाख ५० हजार नागरिक हे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र झाले असून त्यांना ही मात्रा मिळणे गरजेचे आहे. या लसीच्या मात्रा उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस जलदगतीने देण्यात येणार असल्याचे सांगून लसीची उपलब्धता कमी असल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण हे संथगतीने सुरू आहे हे लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र शासनाकडे लसीची मागणी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे साहेब यांनी यावेळी सांगितले ॲड राजेश्वर देशमुख ,शिवाजी हेमके ,युवा पञकार गोपाल चव्हाण, पञकार अविनाश घोगरे , पञकार देवराज कोळे,नरेद्र पाटील ,मोहन पोपळघट,सदिप रनमळे,शरत मुरतकर , बप्पासाहेब खांडे , आदी उपस्थित होते.