Home रायगड माथेरानमध्ये निकृष्ट दर्जाची रस्त्यांची बांधकामे सुरू…प्रशासनाचा कानाडोळा! चौकशी करण्याची मागणी रस्ते ,...

माथेरानमध्ये निकृष्ट दर्जाची रस्त्यांची बांधकामे सुरू…प्रशासनाचा कानाडोळा! चौकशी करण्याची मागणी रस्ते , गटारे बांधकामात ठिसूळ चिरा दगडाचा सर्रास वापर !

1165

कर्जत:जयेश जाधव

माथेरान मध्ये 25 कोटीची विकासकामे सध्या सुरू आहेत,येथील रस्ते हे नेहमीच कळीचा विषय ठरला आहे एमएमआरडीए च्या माध्यमातून माथेरानचा मुख्य रस्ता बनविला जात आहे .

माथेरान अंतर्गत विविध पॉईंट चे रस्ते ,गटारे चिरा दगडात बांधले जात असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले आहे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
माथेरानचे राजकारण नेहमीच रस्ते पाणी व वीज यांच्या भोवतीच फिरत असते काही वर्षांपूर्वी ह्याच जांभा दगडांच्या मुळे येथील सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता गमवावी लागली होती व आताही माथेरानमध्ये मुक्तपणे ठिसूळ जांभा दगडांचा रस्त्यांच्या बांधकामासाठी वापर सुरु झाला असून आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये जांभा दगड कळीचा मुद्दा ठरू शकतो.
माथेरान मध्ये फक्त दगडमाती व क्लेपेवर ब्लॉक च्या रस्त्यांला परवानगी आहे येथील प्रेक्षणीय स्थळांना जाणारे सर्वच रस्ते दगडमातीचे आहेत पण येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दरवर्षी येथील रस्त्यांची दुरावस्था होते व दरवर्षी माथेरानमध्ये रेकॉर्ड पाऊस होत असतो त्या मुळे येथील रस्त्यांची दुरावस्था होत असते, सध्या माथेरान मध्ये विकास कामांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे त्या मुळे येथील अनेक पॉईंटचे रस्ते ,गटारे च्या साईड वॉल ह्या चिरा दगडात बांधल्या जात आहेत, मागील वर्षी सर्व शासकीय इमारती साठी ह्याच दगडाच्या कंपाउंड वॉल बांधल्या गेल्या आता रस्ते व गटारे बांधन्यासाठी ह्याच चिरा दगडाचा वापर केला जात आहे, ह्या दगडाची गुणवत्ता पाहण्यास अधिकारी वर्ग डोळे झाक करीत आहेत, रगबी रोड वरील कामात अत्यंत निकृष्ठ दर्जाचा दगड वापरला जात असून दगडाचा चुरा झालेला दिसून येत आहे. तर अनेक पॉईंट ठिकाणी रस्ता करताना त्या खाली रेती माल न टाकता सरळ दगड ठेऊन त्यावर पॉयटिंग भरून साईड मालाने भरल्या जात आहेत, हा दगड मुळातच निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून येते . घोड्यावरून हा दगड वाहतूक केला जातो तो खाली उतरवताना त्याचे तुकडे होत आहेत. त्याचा रंगातील बदलामुळे तो कच्चा व निकृष्ट दर्जाचा आहे हे लक्षात येते.ह्याच रस्त्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवितात पेव्हर ब्लॉक ची गुणवत्ता तपासूनचं तेच ब्लॉक सर्वत्र बसविले जात आहेत, तसेच चिरा दगडा विषयी गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे, कच्चा दगड दिसत असताना सर्वच ठिकाणी कामे जोरदार सुरू आहेत. दगड खराब आहे हे सर्व नागरिकांना दिसते आहे पण येथील इंजिनियर, प्रशासनाला ह्या बाबत काहीच दिसत नाही , कोणी तक्रार केली,अथवा सोशल मीडियावर वाटस्अप द्वारे चर्चा सुरू झाली मग सर्व हालचाली जागसुद पणाचा देखावा ,मात्र अशा कामांमुळे फक्त पालिकेच्या पैशाचा अपव्यय सुरु असल्याची चर्चा माथेरानमध्ये सुरु आहे.आता आलेला निधीचा माथेरानच्या भवितव्याचा विचार करून चांगल्या प्रकारे कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे , कारण कोरोनाचा फटका सर्व देशाला बसलेला आहे ,त्यामुळे माथेरान साठी यापुढे एवढा निधी उपलब्ध होईल याची शाश्वती नाही, येणारा निवडणुकीत पुन्हा एकदा ह्या चिरा दगडावर गाजणार ह्यात तिळमात्र शंका नाही.तरी या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी माथेरान करांकडून होत आहे.

—-प्रतिक्रिया———-
माथेरान च्या विकासाकरिता मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील सुमारे 25 कोटींची माथेरान मधील अंतर्गत रस्ते व गटारांची कामे सुरु आहेत. ह्या कामात वापरत असलेला जांभा दगड अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. या दगडांचा चुरा झालेला दिसतो. ही कामे ठेकेदार घाई घाईने उरकन्याचा प्रयत्न करीत आहेत. कामे करताना नियमानुसार टेडर प्रमाणे कामे झाली पाहिजेत. पाण्याचा भरपूर वापर केला पाहिजे. घाई घाईने कामे उरकून बिले खिशात घालण्याचा ठेकेदारांनी प्रयत्न करू नये. या करिता या सर्व कामांचे ऑडिट प्रशासनाने करूनच बिले अदा करण्यात यावीत. अशी आमची मागणी आहे.
— वसंत कदम. सामाजिक कार्यकर्ते.