राजेश एन भांगे
संपूर्ण जगभर कोरोना नावाचे संकट आहे, देशात प्रत्येक जण कोरोनाच्या महामाराशि लढा देतोय या मुळे सर्व नागरिकांचे हाल होत आहेत, म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा न करता, या कोरोना च्या लढाईत अतिशय मह्त्वाची भुमिका बजावत असलेलें, नायगांव शासकीय ग्रामीण रुग्णालय यातील वैद्यकीय आधिकारी श्री. गुंटूरकर, नायगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.आर.एस पडवळ, त्यांचे सहकारी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, व शासकीय रूग्णालयातील कर्तव्य दक्ष महिला डॉक्टर, परिचारिका, अदी कर्मचारीवर्ग आपल्या जिवाची कुठलीही परवा न करता अहोरात्र २४ तास अतिशय उल्लेखनीय खंबीर पणे उत्तुंग भुमिका बजावत कामगिरी करून समाजाचे कल्याण करणाऱ्या या कोरोना युध्दाचा सन्मान व सत्कार शिवानंद पांचाळ यांनी केले, यावेळी युवा नेते मा. सुरेश नागोरावजी पाटील कल्याण उपस्थित होते, या नंतर रूग्णालयातील रुग्णांना मास्क वाटप करण्यात आले, तसेच शहरात कोरोना विरुद्धची जनजागृती करत काही गरीब गरजूंना मास्क वाटप केले, शिवानंद पांचाळ नेहमीच ते आपले कर्तव्य समजून आपणासही समाजाचे काही देणें लागते या प्रामाणिक भावनेतून समाजउपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून नेहमी कार्य करत असतात, यांनी जे समाजभान जपत कार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे,