Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी साहेबांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ???

जिल्हाधिकारी साहेबांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ???

906

 

अमीन शाह

कोल्हापूर | कोल्हापूर येथील न्हाव्याचीवाडी परिसरात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. येथील एका युवकाने तो जिल्हाधिकारी झाला असल्याचे भासवून गावात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी भन्नाट शक्कल लढविली आहे. यादरम्यान या तोतया जिल्हाधिकाऱ्याने चक्क निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्याच मुलीशी लग्न केले.आयएएस परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना गावामध्ये भलतीच प्रतिष्ठा मिळत असते. त्यांचे घरामध्ये कौतुक होते. असा प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. मात्र परिक्षेमध्ये नापास झाल्याने कुटुंब आणि गावात नाचक्की होणार या भीतीने अर्जुन सकपाळ नावाच्या युवकाने मोठे ढोंग रचले.अर्जुन याने मी जिल्हाधिकारी झालो असल्याचे गावभर सांगितले. यानंतर गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढत त्याचा मोठा सत्कार केला. गुजरातमध्ये पोस्टींग मिळाली आहे असेही त्याने सांगितले. त्याचा रुबाब तसाच असायचा. यामुळे सर्वांना तो खरंच जिल्हाधिकारी झाला असल्याचा विश्वास बसला.विशेष म्हणजे या तोतया जिल्हाधिकारी अर्जुनच्या दिखाऊपणास कोल्हापुरमधील एक निवृत्त पोलिस अधिकारी बळी पडले. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात त्याच्याशी लावून दिले. काही महिने गुजरातमध्ये अधिकारी असल्याचे भासवल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रात बदली होणार असल्याचे त्याने सांगितले.तोतया जिल्हाधिकारी अर्जुनने एका मित्राला हाताशी धरून आपली रत्नागिरीत जिल्हाधिकीपदी नियुक्ती झाल्याचा बनावट आदेश स्वत: काढला. काही जवळच्या लोकांना याबाबत त्याने माहिती दिली. त्यापैकी काहींनी खात्री करण्यासाठी तो आदेश व्हायरल केला.दरम्यान, जिल्हाधिकारीपदी नियुक्तीचा बोगस आदेश व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवल्याने अर्जुन सकपाळ याला पोलिसांनी अटक केली. अर्जुन सकपाळ याचे शिक्षण बीपी.एड झाले आहे. मागील जवळपास सात वर्षांपासून तो अशाप्रकारे अनेक लोकांना फसवित असल्याची माहिती ही मिळत आहे .