कर्जत: जयेश जाधव
माथेरान मध्ये 25 कोटीची निकृष्ट दर्जाची विकासकामे सध्या सुरू असून एमएमआरडीए च्या माध्यमातून नगरपरिषद माथेरानचा मुख्य रस्ता बनविला जात आहे . असून या कामांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले आहे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र सेक्रेटरी योगेशभाई सरावते यांनी केली आहे .
माथेरान या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी खासदार, आमदार, एमएमआरडीएच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून देखील हा निधी फक्त कागदोपत्रीच दाखवून गिळंकृत केला जातो. अनेकदा रस्ता, पाणी ,वीज यासारख्या विकास कामांच्या नावाखाली बोंबाबोंब सुरू आहे.माथेरान नगरपरिषदेत काही वर्षांपूर्वी ह्याच जांभा दगडांच्या मुळे येथील सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता गमवावी लागली होती व आताही माथेरानमध्ये मुक्तपणे ठिसूळ जांभा दगडांचा रस्त्यांच्या बांधकामासाठी वापर सुरु झाला असून आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये निकृष्ट दर्जाचा जांभा दगड बांधकाम मुद्दा ठरू शकतो. आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीचा दृष्टीकोन डोळ्यासमोर या २५ कोटीच्या निधीतून कोणकोणाच्या वाटेला किती टक्केवारी मिळणार ??यातील सर्वाधिक टक्केवारीचा वाटा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व मुख्याधिकारी यांच्या वाटेला येणार यात कुठलीही शंका नाही आणि हाच पैशाचा वापर आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीत वापर केला जाणार आहे त्यामुळे जनतेच्या पैशाचा चुराडा केला जात आहे असाही सनसनाटी आरोप सरावते यांनी केला आहे.माथेरान या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरघोस निधीचा पाऊस पडतो.परंतु या निधीचा पुरेपूर वापर केला जातो का???ही.निकृष्ट दर्जाची रस्त्यांची बांधकामे, अनधिकृत बांधकामे, राजरोसपणे सुरू आहे पण याविरोधात आवाज उठवला जात नाही.हा एक संशोधनाचा विषय ठरत आहे. माथेरानच्या या समस्या बाबतीत तेथील पत्रकार मुग गिळून गप्प बसले आहेत का??अशा प्रश्न सरावते यांनी केला आहे.स्वार्थी नगरसेवक, अकार्यक्षम नगराध्यक्षा आणि बेजबाबदार मुख्याधिकारी यांच्या कचाट्यात सापडलेल्या नगरपरिषदेवर कुणाचाही अंकुश नसल्याने अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलं आहे
माथेरान मध्ये फक्त दगडमाती व क्लेपेवर ब्लॉकच्या रस्त्यांना परवानगी आहे येथील प्रेक्षणीय स्थळांना जाणारे सर्वच रस्ते दगडमातीचे आहेत पण येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दरवर्षी येथील रस्त्यांची दुरावस्था होते त्यामुळे कोट्यवधी रुपयांची निधीतून थातुरमातुर कामे दाखवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो आहे सध्या माथेरान मध्ये विकास कामांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे त्या मुळे येथील अनेक पॉईंटचे रस्ते ,गटारे च्या साईड वॉल ह्या चिरा दगडात बांधल्या जात आहेत, मागील वर्षी सर्व शासकीय इमारती साठी ह्याच दगडाच्या कंपाउंड वॉल बांधल्या गेल्या आता रस्ते व गटारे बांधन्यासाठी ह्याच चिरा दगडाचा वापर केला जात आहे, ह्या दगडाची गुणवत्ता पाहिली जात नाही, रगबी रोड वरील कामात अत्यंत निकृष्ठ दर्जाचा दगड वापरला जात असून दगडाचा चुरा झालेला दिसून येत आहे. तर अनेक पॉईंट ठिकाणी रस्ता करताना त्या खाली रेती माल न टाकता सरळ दगड ठेऊन त्यावर पॉयटिंग भरून साईड मालाने भरल्या जात आहेत, हा दगड निकृष्ट दर्जाचा असल्याने अशा कामांमुळे फक्त पालिकेच्या पैशाचा अपव्यय सुरु आहे
—-*प्रतिक्रिया——–
-माथेरानच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधीतुन माथेरानच्या रस्त्यांची गटारांची कामे चालू आहेत .परंतु या कामा करिता रत्नगिरी येथून मागविण्यात आलेले जांभ्या लाल दगडाचे चिरे हे अंत्यत निकृष्ट दर्जाचे होत आहे. अशा दगडापासून केलेले रस्ते किंवा गटाराचे बांधकाम अजिबात टिकाऊपणा नाही .तेंव्हा ही विकास कामे चांगली दर्जेदार होणे गरजेचे आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे माथेरान वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे जर निसर्गरम्य माथेरान पर्यटन स्थळावर निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या पैशाचा चुराडा केला जात असेल तर जिल्हाधिकारी रायगड यांनी लक्ष घालून संबधीत ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी
*योगेश भाई सरावते, जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र सेक्रेटरी*