Home नांदेड देगलूर तालुक्यातील रेती घाट व आरोग्य विभागासजिल्हाधिकारींची उमर सांगवी रेती घाटास भेट...

देगलूर तालुक्यातील रेती घाट व आरोग्य विभागासजिल्हाधिकारींची उमर सांगवी रेती घाटास भेट – यापुढिल काळात रात्रीचे उत्खनन व वाहतूकीवर निर्बंध आणण्याचे उपजिल्हाधिकारी शक्ति कलमांना दिले आदेश

287

राजेश एन भांगे

 

नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिनकुमार इटणकर यांनी दि. १२ में रोजी देगलूर तालुक्यातील एकमेव लिलाव झालेल्या उमर सांगवी रेती घाटास अचानक पणे भेट देऊन पाहणी केली.

तर उत्खननासाठी ठरवुन दिलेल्या नदि पात्रातील जागे व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी अवैध उत्खनन केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाईचा इशारा यावेळी प्रशासनासह कंत्राटदारासही जिल्हादंडाधिकारी इटणकर यांनी दिले.

व तसेच यापुढिल काळात रात्रीचे उत्खनन व वाहतुकवर निर्बंध आणण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी शक्ति कदम यांना दिले.
तर देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाचा आढावा घेऊन रूग्णांच्या परिस्थितीची माहिती घेतली.
व तसेच येथील आॉक्सिजन प्लाटंची पाहणी केली
दररोज १२०० लिटर क्षमतेचे वीस मोठ्या सिलेंडर मधुन सध्या आॉक्सिजन उत्पादन होत असुन सध्याच्या रूग्णांच्या गरजेनुसार आॉक्सिजन मुबलक प्रमाणात उत्पादन होत आहे.

गेल्या महिन्यात दैनंदिन ५१२ टन आॉक्सिजन कोविड रुग्णांना लागत होते तर आता ते ९४ एवढे लागत असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ति कदम, तहसीलदार वि.गुंडमवार, तालुका आरोग्य अधिकारी आ.देशमुख, गटविकास अधिकारी या.मुक्कावार, मुख्याधिकारी गं.इरलोड, ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.शि.वलांडे, डॉ.मलशेटवार, डॉ.स.गायकवाड, व तसेच देगलुर तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.