तो तिला जीवापाड प्रेम करीत होता मात्र ती ???
तरुणीवर गुपतीने वार ,
विनोद पत्रे ,
यवतमाळ : पुसद तालुक्यातील धनसळ गावात एकतर्फी प्रेमातून युवकाने सपासप वार करून तरुणीची निर्घृण हत्या केली. ही घटना रामपूरनगर (सावरगाव गोरे) येथे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) रा. रामपूरनगर (सावरगाव गोरे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा अनेक दिवसापासून सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. दरम्यान आज जी सुवर्णा चव्हाण हिचे आई, वडील, भाऊ बाहेरगावी लग्नाला गेले होते. या बाबतची माहिती मिळताच गावातच राहणारा आरोपी आकाश हा तरुणीच्या घरात घुसला. यावेळी आकाशने आपल्या जवळील गुप्तीने तरुणीच्या पोटात सापासप वार करून केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. हा सर्व प्रकार कळल्यानंतर खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनमा केला. तसंच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला.
दरम्यान,हत्या केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याला धनसळ येथील जंगलातून ताब्यात घेतले. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल चावडीकर करत आहे.