Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्हसह 625 कोरोनामुक्त तर 16 मृत्यु    

यवतमाळ जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्हसह 625 कोरोनामुक्त तर 16 मृत्यु    

316

यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह तर 625 जण कोरोनामुक्त झाले असून 16 जणांचा मृत्यु झाला. यातील नऊ मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर पाच मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 6937 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 353 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6584 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4048 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2020 तर गृह विलगीकरणात 2028 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69301 झाली आहे. 24 तासात 625 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 63587 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1666 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 , मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 75, 76 वर्षीय पुरुष तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 68 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, नेर येथील 79 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 27, 67 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 40 वर्षीय महिला आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 92 वर्षीय महिला तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 32 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय महिला, वणी येथील 61, 79  वर्षीय पुरुष आणि  पांढरकवडा येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

            बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 353 जणांमध्ये 216 पुरुष आणि 137 महिला आहेत. यात दारव्हा येथील 77 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 66, आर्णि 39, यवतमाळ 35, पांढरकवडा 29, दिग्रस 24, बाभुळगाव 14,  मारेगाव 14, पुसद 13, महागाव 8, घाटंजी 7, नेर 6, कळंब 5, राळेगाव 5, उमरखेड 3, झरीजामणी 3  आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 552486 नमुने पाठविले असून यापैकी 549915 प्राप्त तर 2571 अप्राप्त आहेत. तसेच 480614 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.