Home नांदेड किनवट एसबीआय शाखेत ग्राहकांची हेळसांड.

किनवट एसबीआय शाखेत ग्राहकांची हेळसांड.

382

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि : १९:- नागरीकांना कशा प्रकारे त्रास देऊन गैरसोय निर्माण करता येईल याकरीता प्रसिध्द असलेली भारतीय स्टेट बॅकेची किनवट शाखा आता त्यांच्या अप्रशिक्षित कर्मचा-यांमुळे किनवट शहरातील ग्राहकांना व व्यापा-यांना मनस्ताप देत आहे. भारतीय स्टेट बॅक हि देशातील क्रमांक एकची ग्राहकसंख्या असलेली बॅक असुन यांच्या ग्राहकांची प्रचंड संख्या पाहता बॅकेंने त्यांना ग्राहकांना सोईचे असलेले इंटरनेट बॅक़ींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे ज्यामुळे ग्राहकांना बॅकेत न जाता अनेक व्यवहार करता यावे जेणे करुन बॅकेत गर्दी निर्माण होऊ नये परंतु एस.बी.आय च्या किनवट शाखेने बॅकेच्या या सुविधे पासुन त्यांच्या ग्राहकांना वंचित ठेवण्याचे ठरवल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

       ग्राहकांना जर इंटरनेट बॅकींग या सुविधेचा लाभ हवा असेल तर ते बॅक़ शाखेत जातात किंवा ज्या ग्राहकांनी इंटरनेट बॅकींग ची सुविधा घेतली आहे त्यांना तत्सम सुविधा जसे, पासवर्ड रिसेट, प्रोफाईल पासवर्ड रिसेट, बेनिफिशरी अप्रुवल, आर.टी.जिएस, नेफ्ट इ व स्टेटमेंट सुविधा घेण्यासाठी तसेच काही तांत्रिक अडचण आल्यास मदत मिळवण्याकरीता ग्राहक बॅक शाखेत जातात परंतु भारतीय स्टेट बॅकेच्या अप्रशिक्षित व उध्दट कर्मचारी, कधीच प्रतिसाद न देणारे व्यवस्थापक हे त्यांना या समस्या बाबत कसलिच मदत करत नाही. जर ग्राहक इंटरनेट बॅक़ींग संबधी कोणतीही समस्या घेऊन बॅक शाखेत गेले तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. व ऑनलाईन बॅकेच्या वेबसाईट वरुन ते करुन घ्या असा फुकट सल्ला देण्यात येतो. यामुळे ग्राहकांना त्यांचे पेमेंट वेळेवर न पोहचल्याने मनस्ताप सहन करावा लागतो.

       किनवट तालुक्यातील एकूणच बॅकींग व्यवस्था हि भगवान भरोसे चालत असल्याचे सध्याचे चित्र आहे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बॅकेचे वेळ सकाळी १० ते दुपारी २ असे करण्यात आले आहे त्यातही इंटरनेट अभावी अनेक बॅक शाखा बंद आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे इंटरनेट केबल तुटल्याचे कारण देत किनवट शहरातील कॅनरा बॅकेचे कामकाज मागील एक आठवड्या पासुन बंद आहे अशीच परिस्थिती शहरातील विविध बॅक शाखांची आहे. आणी जर सर्व सुरळीत असेल तर कामचुकार, अप्रशिक्षित कर्मचा-यांमुळे ग्राहकांना योग्य प्रकारे सुविधा प्राप्त होत नसल्याने किनवट बाबत जी धारणा आहे ती सत्य असल्याचे निदर्शनास येत आहे जी की सर्वात बेकार व वाया गेलेले कर्मचारी शिक्षा म्हणुन ज्यांना काहीच येत नाही असे किनवट येथे पाठवण्यात येतात ते बॅक कर्मचा-यांच्या अशा वर्तनामुळे अगदी खरे वाटत आहे.