Home विदर्भ वर्धा जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

वर्धा जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

571

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

वर्धा, दि 19:-  घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री मिळकत –

वर्धा – रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर – रुपये 1,28,320/-

आष्टी – रुपये 2,44,180/-

कारंजा घा – 61, 430/-

आर्वी – 3, 32,965/-

सेलू – 1,35, 490/-

देवळी – 1,23,760/-

हिंगणघाट – 2,13,570/-

एकूण उलाढाल – 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार – 

आम्ही 4 मित्रांनी मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.