Home नांदेड शेती सुपीक करण्याकरिता व सिंचनाच्या दृष्टीन शेतक-यांनी किनवट तालुक्यातील तलावांतील गाळ जास्तीत...

शेती सुपीक करण्याकरिता व सिंचनाच्या दृष्टीन शेतक-यांनी किनवट तालुक्यातील तलावांतील गाळ जास्तीत जास्त प्रमाणात करावे – किर्ती किरण पुजार. (भा.प्र.से) सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट.

287

मजहर शेख,

नांदेड/किनवट, दि: 22:- सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आहवानाला शेतक-यांचा प्रतिसाद , राजगड येथिल तलावातुन दररोज ५० ते ६० ट्रक्टर गाळ उपसा केल्या जात आहे. यावेळी स्वतः सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांनी तलावातील गाळ उपसा कार्याची पाहणी केल्याने, मागणी केलेल्या शेतक-यांवर गाळ उपसा करण्या संबधी दबाव वाढला आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट व लघु पाटबंधारे जि.प. उपविभाग किनवट यांच्याव्दारे शेतक-यांना किनवट तालुक्यातील तलावातील गाळ उपसा करण्यासंबधी आवाहन करण्यात आले होते परंतु यात मौजे राजगड येथिल तलावाचा समावेश नसल्याने त्या परिसरातील शेतकरी राजगड येथिल तलावाचा समावेश करावा याकरीता सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे पाठपुरावा केला असता शेतक-यांची मागणी व समस्या पाहता सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्वतः भेट देऊन परिस्थिती ची पाहणी केली व ते तलाव गाळ उपसा करण्याकरिता शेतक-यांना उपलब्ध करुन दिले.
परंतु शेतकरी एखाद्या बाबी विषयी मागणी करतात पण जेव्हा ती मागणी पुर्ण केल्या नंतर ते त्या बाबीतुन खरच लाभ घेतात कि नाही किंवा योजनेचा लाभ घेतात कि नाही याची फेरतपासणी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणे कडुन करण्यात येत नाही परंतु सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांची कार्यशैली ही सहकार्य भावनेची असली तरी कोणत्याही बाबीची ते फेरतपासणी करुन घेतात अशीच बाब मौजे राजगड येथिल तलाव शेतक-यांना उपलब्ध करुन दिले परंतु शेतकरी खरच त्या सिंचन तलावातुन गाळ उपसा करत आहे कि नाही याची पाहणी दिनांक २० मे २०२१ रोजी केली आहे.
तर त्यांच्या सोबत यावेळी प्रशासकीय ताफा होता यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांनी मौजे राजगड, धामनदरी, निचपुर सह तालुक्यातील विविध तलावांची पाहणी करुन कोणत्या तलावावर किती प्रमाणात गाळ उपसा केला जात आहे याची पाहणी केली आहे. यावेळी शेतक-यांनी जर जास्तीत जास्त गाळ उपसा केला तर त्याचा व्दिगुणीत लाभ होणार आहे यामुळे शेतातील जमिनीची पत सुधारली जाणार आहे तर तलावात पाण्याची साठवण क्षमता देखिल वाढणार आहे. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे शेतक-यांनी गाळ उपसा करावा या करिता आग्रही आहेत. सिंचन व शेती सुपिक करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील गाळ उपसा करणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी त्यांचा सोबत मृदा जल संधारण विभागाचे अभियंता जाधव, स्वंय सहायत्त गटातील शेतकरी, समभागधारक, सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी, लाभधारक शेतकरी व नागरीक उपस्थित होते.