जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1383 बेड उपलब्ध
यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात 288 जण पॉझेटिव्ह तर 443 जण कोरोनामुक्त झाले असून 13 जणांचा मृत्यु झाला. यातील 11 मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6894 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6606 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3371 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1714 तर गृह विलगीकरणात 1657 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70387 झाली आहे. 24 तासात 443 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 65316 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1700 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.24, मृत्युदर 2.42 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये नेर येथील 51 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 26, 62 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 57, 70 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 65 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 61 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 82 वर्षीय महिला आणि वणी येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. तर खाजगी रुग्णालयात पांढरकवडा येथील 60 वर्षीय पुरुष व घाटंजी येथील 43 वर्षीय पुरुष दगावले.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 288 जणांमध्ये 171 पुरुष आणि 117 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 25 रुग्ण पॉझेटिव्ह, आर्णि 37, बाभुळगाव 11, दारव्हा 25, दिग्रस 17, घाटंजी 13, कळंब 8, महागाव 3, मारेगाव 16, नेर 21, पांढरवकडा 24, पुसद 4, राळेगाव 10, उमरखेड 5, वणी 34, झरीजामणी 29 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 574831 नमुने पाठविले असून यापैकी 572015 प्राप्त तर 2816 अप्राप्त आहेत. तसेच 501628 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1382 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 897 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1382 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 271 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 306 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 148 रुग्णांसाठी उपयोगात, 378 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 478 उपयोगात तर 698 बेड शिल्लक आहेत.