Home विदर्भ कारंजा तालुक्यात प्रहारचे फिरते रक्तदान शिबिर प्रहार चा अभिनव उपक्रम

कारंजा तालुक्यात प्रहारचे फिरते रक्तदान शिबिर प्रहार चा अभिनव उपक्रम

473

वर्धा संपुर्ण देशात कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा.. रक्तावीणा कित्येक रुग्णांचे जाणारे जीव.. अठरा वर्षांवरील व्यक्तीसाठी सरकारने चालू केलेले लसीकरण आणि त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत न करता येणारे रक्तदान यामुळे कारंजा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदानाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. फिरते रक्तदान शिबिर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रहार तर्फे रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्या युवकापर्यंत पोहचून त्याच्या कडून प्रहार रक्तदानाचे कार्य करून घेणार आहे. रक्तदात्याला रुग्णालयापर्यंत पोहचण्यास संचार बंदीमुळे मुळे त्रास होत असल्याकारणाने प्रहार जनशक्ती पक्ष कारंजा तालुका कडून हा अभिनव उपक्रम चालू करण्यात येणार आहे.

येत्या २५ मे पासून या अभिनव उपक्रमाला प्रहारचे कारंजा तालुक्यात प्रहारचे फिरते रक्तदान शिबिर
प्रहार चा अभिनव उपक्रम प्रमुख रुग्नमित्र गजुभाऊ कुबडे, प्रहारचे शेतकरी नेते बाळाभाऊ जगताप, प्रहारचे अक्षय भोणे हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करतील. इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष कारंजा (घा.) तर्फे करण्यात येत आहे. प्रहारच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून हार्दिक शुभेच्छा सुद्धा प्राप्त होत आहे.