जालना – लक्ष्मण बिलोरे
वीज कर्मचाऱ्यांनी शासनाकडे विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा शासन व प्रशासन यांच्याकडे केला होता.परंतु शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करत त्या विविध मागण्या नामंजूर करण्यात आल्यामुळे दि.२४ मे रोजी संयुक्त कृती समिती संघटनेच्या वतीने अंबड येथील कार्यालयात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी न घेता व तमा न बाळगता वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी वर्गाना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देणे तसेच महावितरण मधील सर्व कर्मचारी यांना तातडीने कोविड विरुद्धची लसं न देणे,महावितरण मधील कर्मचाऱ्यांना कोविड १९ मुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह अनुदान ५० लाख ऐवजी ३० लाख देणे,वीज बिल वसुलीसाठी कामगारांना सक्ती करणे,महावितरण कंपनीतील वैदकीय मेडीकलेम योजना आदी मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
परंतु शासनाने या सर्व मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे शासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले.सदरील आंदोलनामध्ये संयुकत कृती समितीतर्फे विभागीय अध्यक्ष विठ्ठल बोने,तालुका प्रमुख पंढरीनाथ भोजने,शेख मोहसीन निजामोद्दीन,किशोर शिंदे,शरद पाटोळे,मुकेश राठोड,गाडे,राजेंद्र राठोड,भाऊसाहेब मुळे,गाढे,पवार,फरहाण शेख,भोला गावडे,प्रफुल वाकोडे आदी कर्मचारी उपस्थित होते.