Home विदर्भ विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण च्या वतीने सॅनिटायझर , नाश्ता आणि पाण्याचे वाटप

विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण च्या वतीने सॅनिटायझर , नाश्ता आणि पाण्याचे वाटप

226

यवतमाळ : येथील विर शिवाजीराजे प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना योद्यांना ज्यांचा डॉक्टर्स प्रमाणेच कोरोनाला नियंत्रणात आणण्यात मोलाचा वाटा आहे. स्वतः ची, परिवाराची पर्वा न करता जनतेसाठी ते दिवस रात्र, उन्हातन्हात अविरत कर्तव्य पार पाडत असतात. असे आपले पोलिस बांधव तसेच सफाई कर्मचारी आणि लहान गरजू मुले यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून पाणी, नास्ता, सैनिटायजर चे वाटप करण्यात आले.

आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून विर शिवाजीराजे प्रतिष्ठाण तर्फे एक छोटीशी मदत.
यावेळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद अवसरे आदिन्नी पुढाकार घेतला. तसेच प्रतिष्ठान चे सचिव राहुल राठी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वरुण तोंदवाल, सर्व सदस्य संकेत लांबकासे, राजेश कोसेकर, कुमार उमक, सूरज दुम्पलवार, सागर लाकडे, नीरज येवतीकर, अमन गुप्ता उपस्थित होते.