Home विदर्भ यवतमाळ ACB च्या जाळ्यात नगर रचना अधिकारी

यवतमाळ ACB च्या जाळ्यात नगर रचना अधिकारी

995

चौदा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

विनोद पञे 

यवतमाळ / पुसद – नालीच्या बांधकामाकरिता ठेकेदाराचे सहा लाख 67 हजाराचे बिल मंजुरीसाठी 14 हजाराची लाच मागणारा अश्विन चव्हाण नामक इंजिनीयर अखेर एसीबी च्या जाळ्यात रंगेहात अडकल्याने पुसद नगरपालिकेमध्ये एकच खळबळ उडाली.
नगर पालिका पुसद अंतर्गत नालीच्या बांधकामाचा ठेका एका ठेकेदारास मिळाला त्या कामाचे सहा लाख 67 हजाराचे रखडलेले बिल काढण्यासाठी नगर रचना अधिकारी अश्विन चव्हाण यांनी ठेकेदार यास 14 हजार रुपयाची मागणी केली होती सदरची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने सदर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळचे डीवायएसपी राजेश मुळे यांच्याकडे तक्रार दिली असता याबाबत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील या तक्रारीनुसार तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम परत जात होती परंतु आज 25 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता सदर ठेकेदाराने सायंकाळी 6 वाजता रक्कम घेण्याचे कबूल केले व त्यानुसार एसीबी पथक पुसद नगर पालिकेत दबा धरून बसली असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे केबिन बाहेर 14 हजाराची रक्कम स्वीकारून अश्विन चव्हाण यांनी ती खिशात ठेवली आणि ते मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये गेले त्यावेळी ठेकेदाराने इशारा करताच एसीबी ची संपूर्ण टीम मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये येऊन झाडाझडती घेतली असता अश्विन चव्हाण यांच्याकडून 14 हजार रुपये लाचेची स्वीकारलेले रक्कम मिळून आल्याने त्यांना मुख्याधिकारी यांच्या समोरूनच ताब्यात घेण्यात आले आज नगर पालिकेमध्ये मिटींग असल्याने जवळपास सर्वच नगरसेवक तथा अधिकारी वर्ग हजर असल्याने एकदाच उडालेल्या या खळबळजनक घटनेने सर्व जण अवाक झाले सदर ट्रप यशस्वी करण्यासाठी एसीबीचे डीवायएसपी राजेश मुळे, हेडकॉन्स्टेबल सुरेंद्र जगदाळे, पखाले, ठाकूर तसेच राहुल यांच्यासह अजमिरे यांनी सदर चा ट्रॅप यशस्वी केला.
तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग यवतमाळ
दुरध्वनी क्रं – 07232-244002,
टोल फ्रि क्रं 1064