मुंबई ,
पत्रकारिता, चित्रपट, तसेच सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय काम करणारे जेष्ठ पत्रकार के रवी दादा यांची,जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र च्या राज्य उपाध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली. हलीच आयोजित राज्य कार्यकारी मंडळ सभेत हा निर्णय घेण्यात आला.
के रवी दादा हे पत्रकारितेतील तसेच सामाजिक क्षेत्रातिल अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते,श्री,सह्याद्री , मनोहर कहानियां , मधुर कथाएं , तहलका सारख्या अशा अनेक लोकप्रिय सप्ताहिकांमध्ये मासिकांनमध्ये त्यांचे लिखाण गाजले आहे, गेली तीस वर्षे गुन्हे , चित्रपट , उद्योग तसेच सामाजिक विषयांच्या पत्रकारितेत कार्यरत राहिल्यामुळे के रवी दादा यांचा पोलीस अधिकाऱ्यां सहित अनेक कलाकार , मंत्री, अधिकारी ह्यांच्याशी निकटचा संबंध आला,आणि एक सेवाभावी चांगला मित्र म्हणून समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळाला आहे,के. रवी दादांचा कायम वलयांकित व्यक्तींमध्ये वावर असला तरी,गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे येत राहिले , पत्रकारांना मार्गदर्शन करणे,त्यांच्या कामात त्यांना प्रोत्साहन देणे ही सर्व कामे सातत्याने आजही करीत आहेत,गेल्या वर्षी लॉक डाऊन काळात के . रवी दादांनी अनेक गरजू पत्रकारांना जीवनावश्यक वस्तू तसेच रोख रक्कम देऊन त्यांना सहकार्य केले होते.
के रवी दादा युनियन चे सुरवातीपासून सभासद असून गेली अनेक वर्षे राज्य कार्यकारिणी मंडळात सदस्य राहिले आहेत,त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा तरुण पत्रकांराना होईल असा विश्वास यूनियनचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी व्यक्त केला आहे .
सदर नियुक्तिने सगल्याच थारातील लोक के रवि दादांना शुभेच्छा देत आहेत .