Home रायगड कर्जतमधील मिथिली अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये अनधिकृत गाळे धारकांवर कारवाईची मागणी

कर्जतमधील मिथिली अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये अनधिकृत गाळे धारकांवर कारवाईची मागणी

591

कर्जत: प्रतिनिधी

कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील बाजारपेठेत मिथिली अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये पाॅर्किंगच्या जागेत बेकायदेशीर अनधिकृत व्यावसायिक गाळे बांधुन नगरपरिषदेचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसत आहे.

सदरची बिल्डिंगच्या नियमबाह्य पद्धतीने प्लॅन बनवून बिल्डरने पार्किंगची जागा गिळंकृत करून येथे व्यवसायासाठी अनधिकृतपणे तीन गाळे बांधले आहे नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल हे व्यवसायाने बिल्डर आहे त्याचे शहरात बहुतांश इमारतीत त्यांनी बिल्डिंगच्या नियमबाह्य पद्धतीने कमी पैशात स्थानिक आर्किटेकच्या माध्यमातून प्लॅन बनवून कामे सुरू केली आहेत बरेच ठिकाणी इमारतींना पार्किंगची व्यवस्था नसल्याने हि वाहने नगरपरिषदेने एम एमआरडी ए च्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी वापरून बांधलेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.त्यामुळे अशी वाहतुकीची समस्या मार्गी लागत नसल्यामुळे शहराला दिवसेंदिवस विद्रुपीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या प्रभागातील बहुतांश इमारतीत पाॅर्कींग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने चित्र आहे. याशिवाय कर्जत रेल्वे स्थानक शेजारी तुळसी रिईल्टी,निम्बेश्वर या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत मोठमोठे अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे बांधुन ग्राहकांना फसविण्याचा धंदा सुरू केला आहे असा सनसनाटी आरोप लेखी पुराव्यानिशी जनहित लोकशाही पार्टी महाराष्ट्र सचिव योगेश सरावते यांनी केला आहे.

प्रतिक्रिया
कर्जत नगरपारिषदेत लोकप्रतिनिधी बिल्डर लाॅबीला व प्रशासनाला हाताशी धरून अनधिकृत गाळे बांधुन नगरसेवक या पदाचा दुरुपयोग करून पार्किंगची समस्या मार्गी लावत नाही हे फार दुर्दैव म्हणावे लागेल.हे अनधिकृत गाळे करोडो रुपयांना विक्री करून लुटण्याचा धंदा करीत आहे अशाचे नगरसेवक पद जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लक्ष घालून रद्द करण्यात यावे
— योगेश भाई सरावते, जनहित लोकशाही पार्टी महाराष्ट्र सचिव