यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कोरोना सेंटरमध्ये एका रुग्णांनी आत्महत्या केली आहे . यामुळे एकच खळबळ उडाली आहे . महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी ५५ वर्षीय बळीराम मोतीराम राठोड असं मृतकाचे नाव आहे . बळीराम हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास पुसद येथील एका खासगी दवाखान्यांमध्ये 28 मे रोजी भरती करण्यात आले होते मात्र खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी बळीराम राठोड यास उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे 30 मे रोजी भर्ती करण्यात आले होते. उपचारानंतर तब्येतीत सुधारणा सुद्धा झाली होती . त्यानुसार त्यास एक दोन दिवसात सुट्टी सुद्धा होणार होती मात्र दरम्यान काल रात्री बळीराम राठोड यांनी प्रसाधनगृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला गळ्यातील शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब डॉक्टरांच्या राऊंड दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी तात्काळ पोलीस हजार झाले ,आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. असे उपजिल्हाधिकारी (SDO) डॉ. व्यंकट राठोड साहेब यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले बळीराम मोतिराम राठोडयांचे पश्चात पत्नी, विवाहित 3 मुले व 1 मुलगी असा आप्त परिवार आहे.पुसद पोलीस अधिक तपास करीत आहेत .