Home रायगड हालिवली ग्रामपंचायतीत ‘शिवस्वराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा,

हालिवली ग्रामपंचायतीत ‘शिवस्वराज्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा,

271

कर्जत – जयेश जाधव

राज्य शासनाने दि. 6 जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण राज्यात हा सोहळा दिमाखात साजरा केला जात आहे. दि.6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर शिवराज्याभिषेक झाला होता. या महान दिवसाची प्रेरणादायी आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून
हाच दिवस राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहाने आणि आंनदी वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात या निमित्ताने रांगोळी व फुलांनी भगवीमय झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकादिवस हा राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला त्यानुसार आज हालिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर स्वराज्य गुढीची पुजा करण्यात आली.
याप्रसंगी,मा.उमरोली विभाग प्रमुख सुरेश बोराडे, ग्रामसेविका सिमा राठोड,उपसरपंच केतन बोराडे,सदस्य मंदाबाई बोराडे, दर्शना बोराडे, मेघा बोराडे,सुवर्णा बोराडे, सोनम जाधव कर्मचारी सोपान बोराडे, मनोहर बोराडे,ग्रामस्थ जनार्दन राणे,प्रविण बोराडे,प्रसाद जोशी,संदिप बोराडे ,व ग्रामस्थ उपस्थित होते.