अभूतपूर्व प्रतिसाद….!
मुस्लिम विरोधी कायदे बणवून हिंदूराष्ट्र निर्माण करण्याचा भाजपाचा एजंडा – सुषमा अंधारे
अब्दुल कय्युम
औरंगाबाद , दि. २१ :- भाजपा सत्तेवर आल्यापासून मुस्लिम विरोधी निर्णय घेवून राजकीय पोळी भाजत आहे, अण्णा हजारेंचे आंदोलन आरएसएस प्रणित असल्याचा केला गंभीर आरोप, मुख्तार अब्बास नक्वी,शायनावर टिका, हजारोच्या संख्येने महीलांनी ऐतिहासिक धरणे आंदोलनात सहभाग, इन्कलाब, आझादी.. आझादीच्या घोषणेने दणाणून गेला परिसर, सिएए, एनआरसी, एनपीआरचा केला कडाडून विरोध, हातात तिरंगे आणि काळे झेंडे घेवून चिमूकले बालकांना घेवून महीलांचा सक्रीय सहभाग
व्हालिएनटरने केले आंदोलनात नियोजन
औरंगाबाद: 19 जानेवारी १९५५ साली एनआरसी वर कायदा बनवलेला असताना मोदी सरकारने यामध्ये सुधारणा करुन CAA आणून एकसंघ देशाला तोडून धार्मिक तेढ निर्माण करुन आरएसएसचा हिंदूराष्ट्र निर्माण करण्याचा एजंडा थोपवण्याचा हा प्रयत्न आहे. पण या देशातील नागरिक सुजाण आहे. सर्व जाती धर्मातील लोक 70 वर्षांपासून मिळून मिसळून सदभावाने राहत आहेत. मुस्लिम समाजातील पूर्वजांनी सुध्दा स्वातंत्र्य संग्रामात आपले रक्त सांडले आहे. आम्हाला कायदा शिकवा पण तो अधिकार फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच आहे. गुजरातचे एक तडीपार आणि दूसरे गोधरा हत्याकांड घडवणारे, मस्जिद पाडून मंदीर बणवण्याचे कट रचणा-यांनी आम्हाला कायदा शिकवू नये. मुस्लिम समाजात सहनशीलता आहे म्हणून त्यांचे विरोधात भाजपा, आरएसएसने सत्ता आल्यापासून एका मागून एक हतकंडे आणत आहे. अगोदर लव जिहाद, मॉब्लिंचिंग, ट्रीपल तलाक, बाबरी मस्जिद त्यानंतर सिएए, एनआरसी, एनपीआरचा कायदा जबरदस्तीने लादले जात आहे. देशाचा जिडीपी वाढत नाही तर कमी होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. मोदी,शाह देशात चांगले शाळा व महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेत असतील तर देश त्यांच्या मागे उभा राहिला असता पण ज्या कायद्याची गरज नाही ते आणून देशातील नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे हे कदापिही सहन केला जाणार नाही. नागरीकत्व सिध्द करण्यासाठी कागदपत्रे कधीही दाखवणार नाही. देशातील सर्व जाती धर्मासाठी हा कायदा धोकादायक आहे.
भाजपाला मुस्लिमांना टार्गेट करुन हिंदूराष्ट्र बणवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप समाजसेविका सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात दिल्लीगेट येथे आयोजित ऐतिहासिक महीलांच्या धरणे आंदोलनात लावला आहे. भारत देशाचे नाव हिंदूस्तान असे संबोधले जाऊ नये असे सांगितले तर आपण गुलाम आहोत असे होईल. जेष्ठ समाजसेवक यांनी दिल्लीत भ्रष्टाचाराचे विरोधात जंतरमंतर वर केलेले आंदोलन आरएसएस प्रणित होते असा आरोप अंधारे यांनी लावला. त्यांनी या कायद्याबद्दल कायदेविषयक बाबी स्पष्ट केले. शेवटी माध्यमावर त्यांनी टिका केली खरे हिरो हे आंदोलनकारी आहेत अण्णा हजारे नव्हते असे सडेतोड भाषण त्यांनी केल्याने टाळ्यांचा कडकडाट झाला. ही लढाई कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिला. इन्कलाब जिंदाबाद… आझादी…आझादी, नारे तकबिर अल्लाहू अकबरने परिसर दणाणून गेला. दुपारी दोन वाजेपासून पाचपर्यंत धरणे आंदोलन सुरू होते. पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने महीला या आंदोलनात सहभागी झाले. 20 ते 25 हजारापर्यंत महीलांचा जनसमुदायात उपस्थित झाला होता अशी चर्चा दिल्लीगेट येथे सुरु होती. शांततेत हे आंदोलन झाले. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. अध्यक्षिय भाषण प्रो.मोनिसा बुशरा यांनी केले. यावेळी सुविधा कल्याणकर या विद्यार्थीनीने हम तो देखेंगे… हम तो देखेंगे ही कविता गावून मने जिंकली. व्यासपीठावर पत्रकार सय्यद नसरीन, श्रीमती फहेमुन्निसा बेगम, संयोजक कमर सुलताना, सह संयोजक खान मुबाश्शिरा फिरदौस, शबाना आयमी, इशरत हाश्मी यांनी भाषण केले. नसिम बेगम यांनी शेवटी दूवा केल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता झाली. जनसमूदाय जेव्हा घराकडे परत येत होता तेव्हा शिस्तीचे दर्शन घडले. एका लाईनमध्ये वाहनांना रस्ता देत महीला आपल्या घराकडे पायी येत होत्या.