धनराज खर्चान
अमरावती – भातकुली तालुक्यातील अळनगाव गावालगत शेत शिवारा दि.१२/६/रोजी सकाळी ८ वाजता पाच ते दहा कुत्र्यांनी शेत शिवारात निल गाईच्या कळपातून दोन पळसाला बाजूला करून त्याच्यावर हल्ला चढवला सुदैवाने ते त्यामधून बचावले व ते गावात शिरले त्यापैकी एक सहकारी मंडळीने सुरक्षित जागी नेले व एक पळस उंच उडी घेऊन गावातील एका घराच्या छतातून घरात कोसळले हि बातमी पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान यांना माहित होताच त्यांनी फॉरेस्ट डीपार्टमेन्टला घटनेची फोन करून दिली.
काही वेळातच वनविभागाची टीम घटना स्थळी दाखल झाली निल गाईच्या पळसाला वनविभागला सोपवण्यात आले पुढील उपचारासाठी अमरावती येथे पळविण्यात आले अशाप्रकारे पोलीस मित्र धनराज खर्चान व गावकऱ्यांच्या मदतीने निलगाईच्या पळसाचे प्राण वाचविले