हाफिज शेख
अहमदनगर – कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घरगुती वादातून मुलाने आजोबांच्या मदतीने हत्या केल्याची फिर्याद मयताच्या दुसऱ्या पत्नीने दिल्यामुळे या बाबत कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि 10 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता सुरेगाव शिवारात सुरेगाव ते कोळगाव थडी जाणारे कच्या रोडवर संजय दामोदर निकम यांचे उसाचे शेताजवळील नालीत तालुका कोपरगाव येथे फिर्यादीचे मयत पती बाबुराव छबुराव निकम वय 51 वर्ष राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांचा खून करून त्यांना रस्त्याच्या कडेला टाकून दिले होते.
याबाबत लताबाई बाबुराव निकम वय 40 वर्ष राह-सुरेगाव तालुका कोपरगाव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हंटले आहे की, सोपान कोपरे व फिर्यादीचे मयत पती यांचे नेहमी होणारे घरगुती भांडणाचे कारणावरून फिर्यादीची सवत नामे झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा सोनु ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व झुंबरबाई तिचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे दोन्ही राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांनी मिळून फिर्यादीचे मयत पती बाबुराव छबुराव निकम यांना काहीतरी टनक शस्त्राने डोक्यात तसेच शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले आहे त्यांच्या या तक्रारी वरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 302,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. दौलतराव जाधव हे करीत आहे.