नाशिक – महात्मा गांधींच्या ,शब्द प्रयोगातून ,खेड्यात चला व खेड्यातील विकास झाला तरच,आपला आणि देशाचा विकास हा भारतातील बहुसंख्य खेडी जी आहेत.त्यावर शहराचा विकास अवलंबून आहे.
ग्राम स्तरावर पंचायत राज बळकटीकरण हे ,स्थानिक स्वराज संस्था यांचे विकेंद्रीकरण करण असून, ग्रामसभा ही गावाची शक्तीस्थान आहे. गावाचा शाश्वत विकास हा येथील मतदान करणाऱ्या जनतेच्या हाती असून या द्वारे आपण योग्य गावकारभार चालवणाऱ्या लोकप्रतिनिधी यांची निवड करत असतो.या पंचायत राज संस्थाच्या बळकटीकरणासाठी ७३वी ७४वी घटना दुरुस्ती व पारदर्शक पणा माहिती अधिकार दप्तर दिरंगाई ,व बदली सारख्या कायदा यात मा ,पद्मश्री अण्णा हजारे यांचे देशासाठी प्रेरणादायी योगदान दिल्याने ,आज खेडी ही विकास करण्यात एक वेगळी झेप घेत आहेत.असे मत राम खुर्दळ यांनी काढले.
हरसूल जवळील तोरगंण या गावी दिनांक १५,जून रोजी महाराष्ट्रातील व देशातील थोर समाज सेवक अण्णा हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवस याचे औचित्य साधून नाशिक जिह्यातील अनेक पर्यावरण क्षेत्रात काम करण्याऱ्या संस्था एकत्र येऊन.त्यांनी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.
या वेळी ब्रम्हगिरी, कृती समिती, जल परिषेद व ग्रामपंचायत जिल्हा परिषेद शाळा ,यांच्या सहयोगातून शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील तसेच गोदावरी गटारीकरन विरोधी मंचाचे निशिकांत पगारे यांनी आपल्या मनोगतात ग्रामविकासासाठी प्रत्यक्ष आपल्या गावाला राळेगणसिद्धी ला आदर्श स्वच्छ पाणीदार ,स्वावलंबी गाव बनवले,आव्हाने येतात मात्र आत्मविश्वास व ध्येय पक्के असल्यास निश्चित्त गावातील विकास करता येतो,या प्रयत्नांचे अनुसरण करून कित्येक गावे आदर्श झाली,आदर्श गाव रचनेत गावाला शुद्ध पाणी,ग्रामपंचायत व नागरी निकोप संवाद,ग्रामसभेत झालेल्या ठरावांवर कार्यवाही केली तर गावाचा लोकाभिमुख विकास होतो,गावातील पर्यावरण इथले डोंगर अबाधित ठेवा तो आपला श्वास आहे,दप्तर दिरंगाईत माहिती अधिकाराच्या नागरी कायद्याने सामान्य माणसाला अधिकार कायदा मिळाला त्यामुळेच गैर कारभाराला आळा बसतो,
पदमश्रीअण्णा हजारे ग्रामविकासाचे प्रणेते आहे,त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांचे विचार अनुसरू असे प्रतिपादन केले,यावेळी पर्यावरणमित्र साहीत्यिक देवचंद महाले यांनी सामाजिक चळवळी सामान्य माणसाला केंद्र स्थानी मानून कार्य करतो,त्याला जनतेने साथ द्यावी असे त्यांनी सांगितले,
या वेळी, तरंगगावच्या सरपंच ,कमल बोरसे गोदावरी प्राधिकरणचे निशिकांत पगारे गड दुर्ग संवर्धनाचे राम खुर्दळ वृकव पर्यावरण प्रेमी,देवचंद महाले, पक्षी मित्र पोपट महाले, जल मित्र आणि आयोजक अनिल बोरसे जेष्ठ नागरिक, रामदास बोरसे.योगेश,बर्वे.मानव अधिकार, समितीचे सुनील परदेशी, राहुल जोरे आदी उपस्तीत होते.