राजेश भांगे
नांदेेड – एकीकडे राज्य आणि केंन्द्र सरकारचे ध्येय धोरण सर्व सामान्यजनासाठी दिवसेदिवस भेडसावणारे असल्याने गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची नितांत गरज भासते ,आज कार्यकर्ते लोप पावत असले तरी समाजाप्रती सक्षम नेतृत्व करणारा शिवानंद पांचाळ नायगांवकर हा एकमेव लायक कार्यकर्ता अनेकांच्या हृदयात आपल्या सामाजिक कामाने घर करत आहे,
शिवानंद यांचा जन्म दिनांक ८ मे १९८५ रोजी एका सर्वसामान्य गरीब सुतार समाजातील माता मथुराबाई पिता दत्तात्रय यांच्या पोटी झाला ,शिवानंद चे वडील दत्तात्रय यांचे अपघातात निधन झाल्याने त्यांना इयत्ता ९ पर्यंतच शिक्षण घेता आले शिवानंद ला आई आणि तिन बहिणी असल्याने कौटंबिक ओझे त्यांच्या डोई पडले, मोलमजुरी करून खाजगी नोकरी करून कुंटूब उदारनिर्वाह सांभाळीत आपल्या तिन्हीही बहिणीचे लग्न शिवानंद केले , या दग दगीच्या धावपळीच्या युगात आणि अल्पवयात एवढे मोठे कुंटूबाचे ओझे सांभाळणे , त्याच्या काय वेदना असतात हे कोणाच्याही नशीबी येऊ नये, पण असे असतानाही शिवानंदने मनात कुठलाच हावरेपणा आजवर आणला नाही , त्यांने समाजाची सेवा करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज म्हणून आज उभा आहे , ज्या जातीत आपण जन्मला त्या विश्वकर्मिय सुतार समाजावर अन्याय अत्याचार कुठे झाला की, त्या कार्यवाहीसाठी पहिले निवेदन शिवानंद देतो हि अंतरीक तळमळ लक्षात घेता महाराष्ट्रात आपल्या समाजाचा तो परिचीत झाला आहे, आपल्या समाज बांधवासह इतर बहुजन समाजातील सर्व सामान्य लोंकाना अनेक विविध सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांना मर्जीने बोलणे ,जिव लावणे त्यांच्या सुख दुखात सहभागी होणे अशा अनेक गोष्टी शिवानंदच्या रक्तात भिनल्या आहेत ,जिव लावले की रानचं पाखरू जवळ येते म्हणतात , शिवानंद हमेशा म्हणतो मला माणसात राहणे आवडते , लोकासाठी संपर्क ही आणि आपला उधारनिर्वाह म्हणून त्यांनी नायगांव शहरात छोटासा उद्योग ही सुरू केला आहे ,यामुळे अनेकांशी व सामाजिक कार्याची झालर अंगी असल्याने तो जिवलग मित्र बनला आहे नेहमीच एखाद्या चांगल्या पवित्र कामासाठी शिवानंद अग्रेसर राहतो हे त्यांच्यातील गुण आहेत , मागील दोनवर्षापुर्वी सांगली / सांतारा जिल्हात महापुराने हाहाकार माजविला होता सर्वसामान्य लोकांचे जगणे मुस्किल झाले होते , म्हणुन अनेक ठिकाणाहुन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आर्थिक निधी होत असताना आपण या कामासाठी मागे रहायचे नाही म्हणून शिवानंदने सांगली सातारा येथील गरजू लोकांना आर्थिक सहकार्य म्हणुन आपली मदत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे देवु केले शिवानंदच्या सर्वच गोष्टीचा उल्लेख कमी शब्दात करता येणार नाही पण त्यांनी लोकांच्या हितासाठी न्याय हक्कासाठी आजवर शासन – प्रशासनाकडे जवळपास शंभरतरी निवेदन दिले आहेत , अनेकजन म्हणतात ये होते काय ,ते होते काय पण शिवानंद प्रयत्नवादी तर आहेत पण अशावादी ही आहे म्हणुन त्यांनी २०१९ च्या नांदेड लोकसभा निवडनुकीत आपली उमेदवारी दाखल केली ,सुतार समाजातील लोकसभेला उमेदवारी दाखल करणे म्हणजे हे महाराष्ट्रातील पहिलाच व्यक्ती असेल ,आपले ध्येय आणि धाडस व भारतीय संविधाना प्रमाणे आपले अधिकार म्हणुन निवडनुक लढविणे हे सोपे जरी असले तरी अलीकडील विविध पक्षाचे भांडवलदारी बलाढ्य नेते मात्र भोळ्या बापड्या जनतेना पैशाची लालच दाखविली हि वस्तुस्थिती लक्षात घेता नांदेड जिल्हातील बलाढ्य नेत्यापुढे आपण निभाव लागणार नाही ,त्यांचा सामना करणे सोपे नाही म्हणुन शिवानंद ला नाईलाजाने आपली लोकसभा उमेदवारी माघार घ्यावी लागली, समाजाचा कार्यकर्ता जगला तर समाज जगणार आहे, आणि तो मेला तर समाजही मरणार आहे, असे विचार त्यांच्या अनेक मित्रापुढे असल्याने त्यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांच्या हाती नेतृत्व देवून आपल्या भविष्यातील अनेक गोष्टीसाठी शिवानंद पांचाळ हाच एकमेव लायक कार्यकर्ता म्हणून त्यांचे खंदे समर्थक म्हणून असलेले मित्र व विविध समाजातील बांधव त्यांना अगामी निवडनुकीसाठी मैदानात उतरविण्याचे चिन्ह मात्र स्पष्ट दिसुन येते , कारण त्यांना विश्वास वाटतो की , फाटले त्याला जनतेनी वारंवार ठिगळ लावणार नसुन ते एक दिवस निश्चितच बध्दल घडवितील व लायक व्यक्तीच्याच खांद्यावर नेतृत्वाची धुरा देतील अशी आशा शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांकर विषयी व्यक्त करतात.