Home नागपूर आपल्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून तो ही गेलं ?? ,

आपल्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून तो ही गेलं ?? ,

1404

 


अमीन शाह ,

परिसरात उडाली खळबळ ,

नागपुरातील पाचपावली परिसरात मोठी धक्कादायक घटना उघडीस आल्याने उपराजधानी हादरून गेलीय . एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे . नागपुरच्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे . दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार , नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी , मुलगा , मुलगी यांची हत्या केली . नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली . हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलंरविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे . सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत . सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत . कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत या घटने मूळे परिसरात खळबळ उडाली आहे ,