Home विदर्भ घाटंजी खापरी चौफुलीवर भाजपाचा चक्काजाम आंदोलन एक तास रस्ता बंद..

घाटंजी खापरी चौफुलीवर भाजपाचा चक्काजाम आंदोलन एक तास रस्ता बंद..

265

घाटंजी / यवतमाळ –  भाजपा तालूका घाटंजी व जिल्हा व्हिजेएनटी आघाड़ी, युवा मोर्चा, सर्व जिल्हा, तालूका प्रकोष्ठचे पदाधिकारी तर्फे झालेल्या राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनात

“ओबीसीं के सन्मान में भाजपा मैदान में” ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा तिडा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्याने हे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. हे खरे सत्य आहे, तरीही महा-भकास आघाडीतील नेते उठ-सुठ केंद्र सरकार कड़े बोट दाखवतात, परंतू हा प्रकार राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडला आहे. ओबीसी विरुद्धचा राज्य सरकारचा व्देष्टेपणा या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे, ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून *घाटंजी-खापरी चौफुलीवर भाजपा तालूका अध्यक्ष श्री. गुड्डूभाऊ शुक्ला, श्री.मोहणभाऊ जाधव जिल्हाध्यक्ष भाजपा व्हीजेएनटी आघाडी,* सर्व जिल्हा व तालूका पदाधिकारी, बहुसंख्य ओबीसी बांधव यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध बॅनर झळकविले व घोषणाबाजी करून निषेध केले.