Home नांदेड वाकोडी येथे कृषि संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन संपन्न

वाकोडी येथे कृषि संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन संपन्न

291

ऑनलाईन पोलीसवाला प्रतिनिधी:-(बालाजी सिलमवार)

खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी महागाव तालुका कृषि विभागाने *कृषि संजीवनी मोहिम* अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

तालुक्यातील मौजे वाकोडी येथे जास्तीत,जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहचुन माहीती व तंत्रज्ञान देण्यासाठी कृषि विभागाकडून गावपातळीवर कालबध्द कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमात पि.जी.बैनवाड कृषि सहाय्यक वाकोडी यांनी मार्गदर्शन करतांना बिबिएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद सरी वरंबा पध्दत),पेरणी पुर्वी बियाणे बिजप्रक्रीया,जमिन आरोग्य पञिकेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर,विकेल ते पिकेल,महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड या विषयी माहिती दिली.
अविनाश वाघमारे,(BTM) यांनी महत्वाचे पिकांची किड रोग नियंत्रणाच्या उपाययोजना माहीती तसेच कृषि विभागाच्या महत्वाच्या सुविधा साठी संपर्क माध्यमांच्या लिंक ची माहिती दिली त्यामध्ये BlogSpot-Krushi-vibhag. blogspot.com या मध्ये कृषि विषयक माहीती WhatsApp वर मिळवण्यासाठी Auto reply सुविधा विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी reply +918010550870 या क्रमांकावर keywords असा संदेश पाठवून किवर्ड्रस प्राप्त होईल,योजनांची आपणास माहिती मिळविता येईल.
तसेच www.krishi.maharashtra.gov.in यामध्ये कृषि विभागाविषयी सर्व माहिती,मार्गदर्शक सुचना विभागाची संरचणा,नागरिकांची सनद कृषि विभाग संबंधित माहिती देण्यात आली आहे.
चर्चा करू शेतीची,कास धरू प्रगतीची तसेच एस.ए.पाटील कृषि सहाय्यक यांनी खरीप पिक व्यवस्थापन बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे व्यवस्थापन कृषि मिञ श्री.मनोज भगत यांनी केले.सदरील कार्यक्रमास वाकोडी येथील उपसरपंच श्री.स्वप्निल विरखडे,खरेदी विक्री संचालक श्री.विनोद भगत,पो.पा.श्री.अनिल देशमुख प्रगतीशील शेतकरी श्री.गजानन पाटे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.