Home विदर्भ भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अवेज खान यांचे आज पासून आमरण उपोषण

भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अवेज खान यांचे आज पासून आमरण उपोषण

537

इकबाल शेख – वर्धा

आष्टी तालुक्यातील नवीन आष्टी येथील गरजू नागरिकांच्या हक्काच्या जमीन वाटपा साठी भाजपा युवा मोर्चाचे वर्धा जिल्हा महामंत्री आवेज खान हे आज पंचायत समितीच्या कार्यालापुढे आमरण उपोषणाचे ठाण मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल साठी जागेच्या प्रतीक्षेत असलेले नवीन आष्टी येथील नागरीक आपल्या रास्त मागणीसाठी आष्टी पंचायत समितीच्या कार्यालया पुढे भाजपचे युवा नेते आवेज खान यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक २८ जून रोजी सकाळी १० वाजता पासून आमरण उपोषणाला बसणार आहे.जिल्ह्यातील इतर ठिकाणी नागरिकांना हक्काचे घरकुल साठी पट्टे वाटप झाले असून नवीन आष्टी येथील नागरिकांना आपल्या हक्काच्या पट्ट्या साठी उपोषण करावा लागत आहे.मागील २वर्षा आधी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बैठक होऊन सुद्धा त्यांना जागेचे पट्टे मिळाले नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उगरले आहे.पावसाळ्यात त्यांना पाण्यात जीव मुठीत घेऊन आपले संसार करावा लागते. अनेक जीव जंतूचा धोका त्यांना असतो.इत्यादी समस्या घेऊन आवेज खान यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करत असल्याचे उपोषकर्त्यांनी सांगितले.सोमवार पासून होत असलेल्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी येऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्या व तात्काळ सदर नागरिकांना आपल्या हक्काचे पट्टे वाटप करावे ही मागणी असल्याचे नागरिकांनी सांगितले.उपोषणाला भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अवेज खान,प्रज्वल चोहटकर,दामोदर बनसोड,भीमराव कांबळे,दिलीप उईके,निलेश राऊत,अवि उईके,हर्शल नेवारे, मेघराज धानोरकर,सतीश नेहारे,राजेंद्र नेहारे,मंगलबाई शेंदरे,मंदा सुरपाम इत्यादी नागरिक बसणार आहे.