घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
अंबड- घनसावंगीचे माजी आमदार ॲड.विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणी चौफुली घनसावंगी येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा व ओबीसीचे आरक्षण रद्द झाले आहे.मराठा व ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या भकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे तसेच सुप्रीम कोर्टात वेळोवेळी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी डाटा उपलब्ध न करून दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण सुद्धा रद्द झाले आहे.या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने आज अॅड.खरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा नेते विश्वजीत खरात, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे ,जिल्हा उपाध्यक्ष देवनाथ जाधव ,पोकळे, डाॅ.रमेश तारगे,भटके विमुक्त जाती जमाती जिल्हा अध्यक्ष विष्णु जाधव, विस्तारक शंकर लहामगे, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश देशमुख, पांडुरंग साळवे,फय्याज पठाण,भरत परदेशी, रामेश्वर गरड ,सुभाष देवडे,भरत उगले,बाळासाहेब बोरकर,राजाभाऊ तौर.विठ्ठल राठोड. पांडुरंग उगले,शिवाजी उगले,संतोष पवार,शिवाजी पवार रघुनाथ मुकणे ,विठ्ठल देशमुख ,रघुनाथ सोसे,शेषनारायण मापारे,राम परदेशी हरिभाऊ ढेरे भगवान माळोदे,भगवान ढेरे,उत्तमराव ढेरे,पटेल भाई,शेख फिरोज, लक्ष्मण भिलारे,समद भाई बाबुराव आर्दड,लक्ष्मण आर्दड, मारोतराव हिंगुरडे, निलेश भागवत, नंदकिशोर शिंदे,मदन गावडे,,माऊली धांडगे,शेख बाबू,गोरख देवडे,प्रल्हाद ढेरे,लक्ष्मण पाटील ,कैलास काकडे, अरूण उगले,डॉ. अनिकेत वरखडे, विजय वरखडे रघुनाथ मुकणे, रामराव वाडेकर, गोरे आवलगाव,व्यंकटराव आरदड, प्रभाकर देशमुख, अमोल तौर,भरत वाघमारे, ठोंबरे तसेच यावेळी मतदारसंघातील जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.