कर्जत: जयेश जाधव
कर्जत तालुका हा ग्रीन झोन म्हणून ओळखला जातो यातच तालुक्यात फाॅर्म हाऊस संस्कृती उदयास आलेली असून पर्यटकांचा ओढा जास्त असतो शनिवार व रविवार या वीकेंड सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात परंतु कोवीड-१९ संसर्गगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी करण्यात आले असून त्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाईचा बडगा उचलला असून रायगड पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांची तपासणी करून उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला असून कर्जत तालुक्यातील एका फाॅम हाऊसमधे मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटक पार्टी करण्यासाठी आले असताना कर्जत पोलिसांनी धाड टाकून एकुण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सध्याचे परिस्थितीत कोवीड 19 या विषाणूंचा संसर्ग होईल व सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल या कारणास्तव रायगड जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रात कोवीड 19 प्रतिबंधात्मक आदेश प्रारीत केले असताना कर्जत पोलिस ठाणेत कर्तव्यावर असताना सहायक पोलिस निरीक्षक संदिपपान सोनावणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविनाश गंगावणे याच्या मालकीच्या अविज व्हिलेज फाॅर्म हाऊस रेस्टॉरंट येथे रायगड जिल्हाधिकारी यांनी कोरोना रोगाचे अनुषंगाने पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून भरपूर लोक जमून पार्टी चालली आहे अशी बातमी मिळाल्याने त्याची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना देऊन खात्री करणेकामी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या परवानगीने सहायक पोलिस निरीक्षक संदिपपान सोनावणे यांनी कर्जत पोलिस ठाण्यातील कर्मचारी व होमगार्ड घेऊन मौजे वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फाॅर्म हाऊस रेस्टॉरंट मध्ये जाऊन खात्री केली असता तेथे भरपूर लोकांची गर्दी असलेली आढळून आले यात मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एकूण ३४ तरूण तरुणीचा समावेश असुन त्यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १९४/२०२१ भा.द.वि कलम १८८,२६९,२७०,२७१, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ५१ अन्वये तसेच सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ कलम ४ व २१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिपपान सोनावणे हे करीत आहेत. कर्जत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे फाॅर्म हाऊस रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत