Home नांदेड पत्रकार संघाच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कदम यांची तर...

पत्रकार संघाच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कदम यांची तर सचिव पदी प्रकाश कार्लेवाड यांची बिन विरोध निवड.

625

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि : ३० :- मराठी पत्रकार परिषदेच्या आज संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते पत्रकार संघाच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कदम यांची तर सचिव पदी प्रकाश कार्लेवाड यांची बिन विरोध निवड घोषित करण्यात आली.
       शहरातील साईबाबा मंदिर परिसरात आयोजित सर्वसाधारण सभेच्या बैठकीच्या अध्यक्ष पदी पत्रकार संघाच्या कोर कमिटीचे प्रमुख प्रा. किशनराव किनवटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वाकोडीकर, किशन भोयर व कोर कमिटीचे कें. मुर्ती , फुलाजी गरड, शिवराज राघु मामा, भोजराज देशमुख, सुरेश सोळंके पाटील, सुनिल श्रीममनवार, गंगाधर गड्डमवार, सुनिल श्रीमनवार, माजी अध्यक्ष दुर्गादास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत मावळते पत्रकार सचिव बापुसाहेब, तुप्पेकर यांनी मागील वर्षीचा लेखा जोखा सादर करुन नविन कार्यकारणी निवडी बाबत अध्यक्षांच्या परवानग़ीने सर्वानुमते बिन विरोध किनवट तालुका नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यात तालुका अध्यक्ष पदी सुधाकर कदम, ता. सचिव प्रकाश कार्लेवाड, सहसचिव किरण ठाकरे, ता. उपाध्यक्ष दिलीपराव राठोड, उपाध्यक्ष आडेलु बोनगीर, उपाध्यक्ष , दिनेश चव्हाण, संतोष अनंतवार तर प्रसार व प्रसिध्दी प्रमुख पदी कचरु जोशी यांची निवड घोषित करुन कोषाध्यक्ष केशव ढहाके, सहकोषाध्यक्ष बालाजी शिरसाठ, ता. कार्यकारणी सदस्य ऍड. विलास सुर्यवंशी(शामिले), जयपाल जाधव, गौतम येरेकार, अनंत सोनटक्के यांची निवड करुन कार्याध्यक्ष म्हणून इश्वर जाधव यांची निवड करण्यात आली.
        सर्वांची निवड घोषित करुन नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कोरोना चा प्रभाव असल्याने निवडणुक न घेता हि नविन कार्यकारणी बिन विरोध करण्यात आली तर कोरोना काळात पत्रकारांना संरक्षण प्राप्त व्हावे या करिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी व दानशुर व्यक्तींनी पत्रकारांचा आरोग्य विषयक विमा काढावा याकरीता नविन कार्यकारणी मध्ये ठराव मंजुर करण्यात आला. व पत्रकारांनी बातमी प्रकाशित केल्या नंतर एकाद्या असामाजिक तत्वाकडुन जर पत्रकाराला धमकी देण्याचे प्रकार सर्रास घटड असल्याने अशावेळी सर्व पत्रकारांनी सहकारी पत्रकाराच्या बाजु उभे राहुन लढा उभारण्याचे देखिल ठराव संमत करण्यात आले आहे.
       देशात व राज्यात पत्रकारांच्या संरक्षणासाठी विविध कायद्यांची निर्मिती केली आहे अशा कायद्या विषयी समाजात म्हणावी तशी जागरुकता नाही ती निर्माण व्हावी या करिता देखिल पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी प्रयत्न करणार आहे या करिता किनवट पत्रकार संघटनेत ऍड विलास सुर्यवंशी यांची कायदेविषयक सल्लागार पदी निवड करण्यात आली.