रविंद्र गायकवाड
औरंगाबाद / बिडकीन , दि. २२ :- पैठण तालुक्यातील प्रा.आे.कें.निलजगाल येथे कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी डॉ.भुषण आगाज यांचा बिडकीन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.बोगस डॉक्टर वरील धडाकेबाज कार्यवाही केल्यामुळे हा सत्कार करुन त्यांच्या कामकाजाला वाव देण्याचे काम बिडकीन येथील डॉक्टर असोसिएशनच्या टिमने केले.
यावेळी डॉ. शिंदे , डॉ. ञिभुवन , डॉ. गायकवाड , डॉ. जंगले , डॉ. पाटिल , डॉ. पाडळकर , डॉ .नवपुते यांनी या सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वैद्यकिय अधिकारी डॉ.भुषण आगाज यांना पुढे यापेक्षा ही मोठ्या कार्यवाही करावी याबाबतच्या शुभेच्छा देण्यात आल्या.