लक्ष्मण बिलोरे
जालना, मराठवाडा – मुलाचे लग्न ठरल्यामुळे औरंगाबाद येथून जालना शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलेवर दोन सराईत गुन्हेगार असलेल्या महीलांनी पाळत ठेवून त्या महिलेचे ५० हजार रुपये शिताफीने लंपास केले.
हि बाब लक्षात येताच गांगारून गेलेल्या महिलेने तेथे कर्तव्यावर असलेले सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांना घटनेची माहिती दिली… कर्तृत्वदक्ष पोलिस अधिकारी परशुराम पवार यांनी वेळ न दवडता सदर महिलेच्या तोंडी तक्रारीवरून तात्काळ वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.सराईत गुन्हेगार असलेल्या दोन महीलांना अॅटोरिक्षा मधून पळून जात असताना सिनेस्टाईल पाठलाग करून अवघ्या दोन तासात पकडले आणि सदर बाजार पोलिस ठाण्यात हजर केले.पोलिसीखाक्या दाखवताच सदर चोर महीला पोपटासारख्या बोलू लागल्या झाडाझडती मध्ये त्यांच्याकडे ५० हजार रूपयांची रोख रक्कम मिळून आली . उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील या महिलेस ५० हजार रुपये सुपुर्द करण्यात आले.पकडण्यात आलेल्या चोर महीला नंदा किशोर पवार वय २६ वर्षे, राहणार वडिगोद्री,अर्चना नारायण पवार वय २० वर्षे, राहणार अंबड बसस्थानक या महिला चोर रेकाॅर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार महिला पोलिस कॉन्स्टेबल कमल गिरी, महिला पोलिस नाईक सिंधू खर्जुले यांनी केली.