Home विदर्भ वर्धा सायबर सेलने शोधले हरविलेले 108 मोबाईल

वर्धा सायबर सेलने शोधले हरविलेले 108 मोबाईल

455

इकबाल शेख

मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे.

अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला गहाळ झालेल्या मोबाईल च्या तक्रारीचे प्रमाण वाढले होते. महागडे अन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने व्यक्तीचा हिरमोड होतो. अश्या नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर यांनी आखली व सदरची जबाबदारी सायबर सेल, वर्धा यांना देण्यात आली होती. त्यावरुन सायबर सेल पथकाने दैनंदिन कामकाज सांभाळुन हरविलेल्या मोबाईलचे शोध घेण्याचे आदेश प्राप्त होताच मा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी व सायबर सेल वर्धा चे पथकाने मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु केले. सदर शोध मोहीम दरम्यान चालु वर्षात वर्धा जिल्ह्यात हरविलेले मोबाईल पैकी वर्धा जिल्ह्यातुन व आजुबाजुचे जिल्ह्यातुन एकुण 108 मोबाईल एकुण कि. 11,20,000 रु. चे हस्तगत करण्यात आले.
सदरचे मोबाईल हे त्यांचे मुळ मालकांना परत करणे करीता त्यांचेशी संपर्क करण्यात आला व पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे मुळ मालकांना बोलावुन त्यांना सुपुर्त करण्यात आले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात सपोनि. महेन्द्र इंगळे, पोउपनि. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, प्रकाश गुजर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जिभे, शाहिन सैय्यद, स्मिता महाजन, सर्व सायबर सेल, वर्धा यांनी केली.