यवतमाळ – सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दक्ष नागरिक फाऊंडेशन यवतमाळच्या वतीने निळोणा येथील वृद्धाश्रमात संस्थेच्या राज्याध्यक्षा सौ. अलकाताई कोथळे व शहर अध्यक्षा सौ. माणिक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी ह्या प्रामुख्याने आवर्जुन उपस्थित होत्या. या प्रसंगी दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या सदस्यांच्या वतीने निळोणा वृध्दाश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ज्यांनी जे झाड लावले त्या झाडाला त्यांचे नांव देण्यात आले. वृक्षांप्रति प्रेम असावे म्हणून ही संकल्पना दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या शहर अध्यक्षा सौ. माणिक पांडे यांनी साकार करुन या लावलेल्या वृक्षांचे जो निट वर्षभर देखभाल करेल त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही सौ. माणिक पांडे यांनी सांगितले. या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी यांनी पण आपल्या नावाचे फळाचे वृक्ष वृद्धाश्रमात लावले. हे झाड मोठे झाल्यावर जेष्ठांना फळे खावयास मिळावी म्हणून फळांची झाडे लावले असल्याचे सांगीतले. दक्ष नागरिक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ऊजवणे यांच्या वाढदिवस असल्याने त्यांनी निळोणा येथील वृद्ध आश्रमातील वृद्धांना जेवण देऊन वृद्धांसोबत दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या सदस्यांनी वेळ घालविला.
या प्रसंगी संस्थेच्या करुणा धनेवार, प्रशांत ऊजवणे, सचिन येवतीकर, सौ. माणिक पांडे, डॉ. कविता बोरकर, सौ. सरला इंगळे, डॉ. लकडे आदिसह दक्ष नागरिक फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संस्थेच्या सौ. माणिक पांडे यांनी केले.”