प्रतिनिधी – धनराज खर्चान
अमरावती – भातकुली तालुक्यातील शेतकरी पावसामुळे सुखावला मागील १२ ते १५ दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पीक सुद्धा करपू लागली होती मात्र काल दुपार पासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली.रविवार सकाळी ४च्या सुमारास जोरदार पाऊस बसरला त्यामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्याना पाणी आले.तालुक्यातील खॊलापूर ते अळणगांव मार्गावरील कसारी या नाल्याला आलेल्या पुरात दोन निलगाई वाहत गेल्या त्यातील एका निलगाईला पुरातुन निघण्याच्या यश आले तर एक निलगाई वाहून गेली. तसेच कुंड ते अळणगांव ता रस्त्यावरील गावालगत छोटा पूल वाहून गेला.त्यामुळे अळणगांव या गावच्या जिल्ह्याशी संपर्क तुटला.तसेच अळणगांव ते कुंड या मार्गावरील गाळ गावातील काही तरुणांनी काढला .या धो धो आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतीतील खरीप पीक खरडून गेले काही शेतात तर नाल्याचे पाणी शिरले.त्यामध्ये शेतकऱ्याचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले.तालुक्यातील शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी.