नाशिक – नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील कडवईपाडा(ता.पेठ)या भागातील ५० लोकलावंतांना व्हिडीओ व्होलेंटीअरच्या माध्यमातून तसेच नाशिकच्या समुदाय पत्रकार मायाताई खोडवे यांच्या प्रयत्नातून(बुधवार १४ जुलै रोजी) किराणा साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी या भागातील जुन्या जाणत्या परंपरागत लोककला जोपासणाऱ्या कलावंतांना कोरोना काळात रोजगार नव्हता, तसेच मोठ्या प्रतिकूल स्थितीत हे लोककलावन्त आपले जीवन जगत होते,त्यांना या अडचणीत साहाय्य व्हावे यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा उपक्रम घेण्यात आल्याचे समुदाय पत्रकार मायाताई खोडवे यांनी सांगितले.
गेल्या १६ महिन्यांपासून सामान्य माणूस कोरोनाच्या काळात मोठ्या अडचणीत आहे.त्यात दुर्गम नाशिक, त्रंबकेश्वर,पेठ तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात हजारो लोककलावन्त आहेत.त्यांचे सण, उत्सवाला,विवाहात,मिरवणुकीत असणारे संस्कृतीक कार्यक्रम कोरोना काळात पूर्ण बंद आहे,यात कलगी-तुरा,पावरी वादक,मृदुग,तबला,ढोल,पेटी,वाद्य वादक,नाच्या,झिलक्या,
कणाती कार,गावठी तमाशा,बोहाडे,अश्या धार्मिक,
अध्यात्मिक,
सामाजिक स्थरावर
लोककलेचा वारसा चालवणारे हजारो लोककलावन्त आहेत,शासनाचे मानधन मिळत नाही त्यात कुठले काम ही या काळात मिळत नसल्याने या लोककला अस्ताला चालल्याने या कला आजच्या इंटरनेट युगात टिकवल्या पाहिजे म्हणून दुर्गम भागातील कलावंतांना ही मदत म्हणजे या कलावंतांचा उत्साह द्विगुणित करणारी आहे असे या भागातील कलावंत हभप.जगदीश महाराज जाधव यांनी सांगितले.या प्रसंगी लोककलावंतांनी आपल्या लोककला सादर केल्या.यावेळी उपस्थित कलावंतांना किराणा साहित्यासह ,हात धुण्यासाठी साबण,मास्क ही देण्यात आले.
यावेळी जर्नलिष्ठ ऍक्टिव्हिजम फोरमचे प्रवर्तक आनंद उर्फ दादाजी पगारे,जिल्हा ग्रामविकास संवाद मंचचे समन्वयक पत्रकार राम खुर्दळ,शिवकार्य गडकोटचे दुर्गसंवर्धक विष्णू खैरनार,जगदीश महाराज जाधव यासह लोककलावन्त यावेळी उपस्थित होते.याकामी प्रवीण कोरडे यांची ही साथ लाभली.
प्रतिक्रिया::-
आनंद उर्फ दादाजी पगारे::-
ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी दुर्गम भागात परंपरागत लोककलेचा वारसा जोपासणारे अनेक कलावंत आहे,त्यांचे पर्यंत कोणी पोहोचत नाही,त्यांना सामाजिक,राजकीय हातभार नाही,अश्या लोककला जीवापाड जपणाऱ्या लोककलेमूळ सामाजिक सद्भावना,सलोखा,व्यसनमुक्त जीवन,मराठी भाषा संस्कृती जपली जाते,कोरोनाच्या काळात हे कलावंत खूप अडचणीत होते त्यांच्या त्यागाची जाणीव म्हणून व्हिडिओ व्हॅलेंटीअर मायाताई खोडवे यांच्या प्रयत्नातून कडवईपाडा येथे ५० लोकलावंतांना किराणा वाटप केला.याआधी ही दुर्गम भागातील महिला,विधवा महिलांच्या कुटुंबाना असे किराणा साहित्याचे वाटप केले होते,लुप्त होत चाललेल्या मराठी लोककला जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,त्यासाठी हा अल्प प्रयत्न.