मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट,दि,१४:- सारखणी ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव दिनांक 07/07/2021 रोजी 9 सदस्यांनी महिला सरपंच सौ वनमाला तोडसाम यांच्या विरोधात तहसीलदार किनवट यांच्याकडे सादर केला होता त्या अविश्वास ठरावावर दिनांक 13/072021 रोजी सकाळी 11 वाजता मतदान घेण्यात आल्यावर उपस्थित सदस्यांनी पुन्हा सौ वनमाला तोडसाम यांना सरपंच पद बहाल करण्यात आले.
किनवट पासून 25 किलोमीटर अंतरावर माहूर रोडवर सारखणी ग्रामपंचायत अंतर्गत थेट निवडणूक प्रक्रियेतून महिला सरपंच सौ वनमाला तोडसाम या निवडून आल्या होत्या सदर महिला सरपंच या उच्चशिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे चालवत असल्याने व त्यांचा गावातील जनतेशी थेट संपर्क असल्याने गावामध्ये यांच्या कार्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण झाली होती परंतु गावातील काही राजकीय मंडळींना याचा त्रास होणे सहाजिकच असल्याने सरपंच सौ वनमाला तोडसाम यांना पदावरून दूर करण्यासाठी राजकारण्यांनी अशिक्षित सदस्यांना हाताशी धरून दिनांक 07/07/2021 रोजी 11 पैकी 9 सदस्यांना किनवट येथे आणून अविश्वास ठराव तहसील किनवट येथे दाखल करण्यात आल्या नुसार तहसीलदार किनवट यांनी दिनांक 13/07/2021 रोजी सकाळी 11 वाजता सदर अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आले नुसार 11सदस्यांपैकी 10 सदस्यांनी मतदान प्रक्रिया भाग घेऊन सरपंच सौ वनमाला तोडसाम यांच्या बाजूने 7-3 असे मतदान झाल्याने पुन्हा सरपंच हे पूर्ववत पदावर कार्यरत आहेत असे जाहीर होतात सरपंच यांच्या गोठ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदार उत्तम कागणे हे प्रामुख्याने उपस्थित होते तर त्यांना या कामे सहकारी नितीन शिंदे निवडणूक लिपिक देवकते तलाठी कदम हे उपस्थित होते तर सदर पूर्ण प्रक्रिया चा लेखी ठराव सारखणी चे ग्रामसेवक संतोष ताडेवार यांनी पूर्ण केला या कामे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके ,डी आर भोपळे ,जी डी चव्हाण, ए एस आय जे एस राठोड, एम एफ पेंदोर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने भयमुक्त वातावरणात सदर प्रक्रिया पार पडल्याने सरपंच यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार मानले.