Home विदर्भ कोरोना पडला थंडा, आता डेंग्यूने काढले तोंड वर रामदरा वार्ड क्रं १...

कोरोना पडला थंडा, आता डेंग्यूने काढले तोंड वर रामदरा वार्ड क्रं १ व २ मध्ये डेंग्युचे सर्वाधीक रुग्ण

126

ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग आले अॅक्शन मोडमध्ये.

वर्धा – इकबाल शेख

तळेगांव (शा.पं.) : – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असताना आता डेंग्यूने तोंड वर काढले आहे.तळेगावातील रामदरा वार्ड क्रं. १ व २ मध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील काही रुग्ण हे आर्वी येथील तर काहि अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
परीसरात आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.तेव्हा वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. परंतु डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूसह अन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. या सबंधाने स्थानिक आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने उपाय योजना सुरु केल्या आहे. तळेगावातील रामदरा वार्ड क्र. १ व २ सह संपुर्ण वार्डात आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रविन ईंगळे, आरोग्य सेवक संदिप खार्डे, आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण, अर्चना दारुंडे आशा वर्कर घरोघरी जावुन तपासणी करीत आहे तसेच डेंग्यु आजाराबद्दल जनजागृती सुरु केली आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाने गावात डासांकरीता फवारणी सुरु केली आहे.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे आता कोरोनाची भीती नाही. परंतु आता डेंग्यु, मलेरीया सारख्या आजाराची भिती निर्माण होत आहे.