समाजाचा आरसा म्हणून समर्पित आयुष्य जगणा-या पत्रकारांसाठी….!
पत्रकारितेचे विविध अंग आहे , संपादक , वृत्तसंपादक , उपसंपादक, शहर बातमीदार,तालुका,गाव,शहरी बिटवर कार्यरत पत्रकार असे अनेक स्थर आहेत,अंशकालीन सुद्धा हुद्दा नसलेला केवळ ओळखपत्र व त्यावर जबाबदारीचे ओझे पेलणारा, बिनपगारी,बिनमानधन अथवा अल्प मानधन असणारे लाखो पत्रकार आहेत,ग्रामीण व शहरी वस्तीतील थेट समाजात जाऊन तेथील घटना घडामोडी वास्तव मांडणारा पत्रकार राब-राब राबत असतो मात्र त्याबदल्यात त्याचा प्रपंच सोडा त्याचा खर्च ही भागत नसतो,पत्रकारितेच्या इतिहासात वैविध्यपूर्ण,वाचनीय मांडणी करणारा,अनेकांचे भविष्य घडवणारा,सामाजिक उपेक्षा अडचणींना वाचा फोडणारा,कित्येक नेतृत्वाना घडवणारा,संस्कृती, परंपराना लेखणी,चित्रिकरनातून मांडणारा,त्यासाठी होईल तितके श्रम देणारा,खिश्यात मोबाईल टाँकटाईम नसतांना उसने पासने घेऊन बातमी वेळेत शहरात मेलने पाठवणारा,ज्यास्तीत ज्यास्त वेळ बातमीच्या शोधात घालवणारा,बदल्यात बातमीचे चांगले कमी वाईट परिणाम भोगणारा,बातमीच्या कष्टाचा मूळ मोबदला मिळत नसतांना,केवळ पत्रकारितेशी इमान राखून उपाशी तापाशी राहून प्रसंगी स्वतःचा रोजगार,व्यवसाय बुडवून,प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून,घरच्यांचा विरोध पत्करून,कित्येकांशी वैर घेऊन पत्रकारिता करणाऱ्या इमानी पत्रकारांचे जीवन अत्यंत खडतर,प्रतिकूल असते,हे केवळ बोटावर मोजता येईल इतक्या जाणकार जानतात,बहुतांशी समाज व नेते,अधीकारी,यांना या पत्रकारांची धडपड फार दिसत नाही,त्यांना ती जाणून घेण्यात काही रस नसतो,केवळ “बातमी द्या,बातमी आली का?”इतका तगादा मात्र सगळे लावता,अश्यावेळी राबणाऱ्या त्या पत्रकारांस नीट झोप सुद्धा मिळत नाही, घरची तोकडी परिस्थिती त्यात अधिक वेळ बातमीत घालवणारे अनेक पत्रकारांचे आयुष्य,त्यांचे कौटुंबिक जीवन यात खूप यातना असतात.अडचणी असतात. मुलांचे शिक्षण,घरातील आजारपाजार,किराणा,
लाईटबिले,घरभाडे,कर,इंधन खर्च,मोबाईल,व नेटखर्च यात त्याचे कंबरडे मोडून निघते,त्या पत्रकारांच्या अडचणीच्या बातम्या कोण्ही छापत नाही,त्याला कुठली संघटना,माध्यम हातभार लावत नाही,मात्र त्या त्या पत्रकार अपघातग्रस्त झाला,किंवा त्याला माफिया समाजकंठक यांनी मारहाण केली,फोनवर दमदाटया दिल्या,गावात असलेला व्यवसाय धड चालत नाही,व्यवसायास जागा मिळू दिली जात नाही,सातत्याने समाजात जागृती करणारा पत्रकार प्रसंगी आजाराने ग्रस्त झाला तर त्याला प्रसंगाला कोणी हात देत नाही.ही वेळ कित्येक इमानी पत्रकारांच्या आयुष्यात आली आहे.पत्रकार नावाने मोठा त्याच्या कौटुंबिक खर्चासाठी असणाऱ्या आर्थिक चणचण त्याला असह्य वेदना समाजाला,सरकारला,त्यांच्या संघटनांना कळणार कधी?केवळ जोतो आपल्याच पोटावर आहार ओढतो,मात्र अडचणीत असलेल्या,अख्ख आयुष्य समाजासाठी धडपडणाऱ्या माध्यमकर्मींचे आयुष्य मात्र विवंचनेत आहे,हे अढळ सत्य अजूनही कोण्ही समजून घेत नाही,हे कष्टकरी,इमानी पत्रकारांचे दुर्दैवच..
“अंधेरेमे जो रहेते है,
नजर उनपे भी कूच डालो,
अरे ओ रोशनी वालो,
हमारे भी है कूच सपणे,
अरे ओ रोशनी वालो”
जेष्ठ गायक महेंद्रकुमार यांचे गाणे ऐकल्यावर त्या गाण्याने जे सांगितले,ते आपण कष्टकरी पत्रकारांनी जाणून घेतले पाहिजे,पत्रकार हा समाजाचा आरसा आहे,हे ठाम निश्चित आपले ध्येय असावे,मात्र बदलत्या काळातही बदलाच्या नादी बहेकू नका मात्र आपण हे एकमेव कर्तव्य कर्म आचरणात आणले पाहिजे,तरच आपण खऱ्या अर्थाने पत्रकार असतो,पत्रकारांचे स्थर अनेक आहेत नेमक्या उपेक्षित आयुष्य जगणारे अनेक पत्रकार आंधळ्या बहिऱ्या व्यवस्थाना दिसत नाही,दुकाने मांडून अव्यवहार्यपणे चाललेल्या पत्रकारितेला दोष देणारे लोक,पुढारी,आपल्यातील बडे असामी पावलोपावली दिसतील,मात्र इमानी पत्रकारिता करणारा,तो वस्तीतील,खेड्यातील,दुर्गम भागातील कार्यरत पत्रकारांशी आपुलकीने संवेदनशीलपणे जाणून घेण्यासाठी आजकाल कोणाला वेळ नाही,काही पत्रकार संघटनांचे नेते त्यांना ही झळ जाणवत नाही,यामुळं मूळ कष्टकरी पत्रकारिता सातत्याने अंधारात,दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.कारण आपली कदर माध्यमे,संघटना,जिल्हा माहिती केंद्र,अधिकारी,सरकारला,समाजाला कळणार नाही,ते लपवून ठेवू नका,नाहीतर असेच घासून झिझुण जाऊ,
आपल्याला अधिस्वीकृत्ति नाही,कुठली प्रवास सवलत नाही,जिल्हा माहिती केंद्र आपल्याला ओळखत नाही,सरकारी कार्यालयात आपली नोंद नाही,आपल्याला संरक्षण नाही,आपल्याला पर्याप्त रोजगार नाही,आपल्याला पेन्शन नाही,आपल्या मुलांना मोफत शिक्षण नाही,आपल्याला आजारात,अपघातात सवलत सेवा नाही,आपल्या आजारात,अपघातात आपले कोणी नाही,आपल्याला मारहाण झाली तर आपल्याला अपराधी ठरवणारा समाज ही आपला नसतो, आपण ज्यांना मोठं केलं,ते ही संकटात आपले नाही,आयुष्यभर पत्रकारिता करून म्हातारपणात आपण निराधार,मग आपल्यात उर बडवून मिरवणारे जे हेतू ठेवून पत्रकारिता करतात,त्यांना सन्मान आहे,मात्र तुम्ही गावात वस्तीत व्यवसायासाठी जागा मागा,तुम्हाला विरोध होईल,अख्ख्या जगाची भ्रांत ठेवणारा इमानी पत्रकार स्वतःच्या घरादाराची अडचण करून धडपडत असतो,सामाजिक मुद्द्यावर आवाज उठवतो तो अनेकांना दुश्मन वाटतो…
मात्र घेतला वसा सोडू नका,विधाता सर्वांची नोंद घेतो,तुम्ही नटसम्राट आहात तुमच्या इमानी पनाला वेदनेचे उपेक्षेचे हार तुमच्या गळ्यात टाकणारे तुम्हाला घरादारात,समाजात भेटतील याची जाणीव ठेवा,
व जस जगाची उपेक्षा लिहिता,दाखवता अरे बाबांनो कधीतरी स्वतःच आयुष्य उपेक्षा लिहा,दाखवा..
जर असेच लपवत बुरखे घेऊन मिरवलो तर शेतातील बुजगावणे बनाल हे ध्यानात घ्या…
इतकीच अपेक्षा…
आपला माध्यमकर्मी::-
राम खुर्दळ ( पत्रकार )
राज्यउपाध्यक्ष – “पत्रकार संरक्षण समिती” , महाराष्ट्र राज्य
मो- 9423055801