प्रतीनिधी: धनराज खर्चान
अमरावती – भातकुली तालुक्यात आज दिनांक १८ जुलै दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला.त्या पावसामुळे खारतळे गाव या गावातून वाहत असलेल्या कसारी या नाल्याला पुर आला. पुर पहायला गेले असता पाय घसरुन त्यामधे खारतळेगाव येथील दोन तरुन प्रवीन रामराव गुडधे (३४) व निरंजन गुडधे (२६) असे तरुणांचे नाव असुन नाल्यात आलेल्या पुरात वाहत गेले. या घटनेची माहीती खारतळेगाव येथील सरपंच रुपेश कळसकर यांनी तहसीलदार व तलाठी यांना दिली. माहीती मिळताच तहसीलदार, तलाठी तसेच राज्य राखीव पोलीस दल (गट क्र.९)अमरावती घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य व शोध मोहीम सुरु असुन अद्याप तरुणांचा शोध लागलेला नाही.