रेस्क्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश
प्रतीनिधी – धनराज खर्चान
अमराावती – भातकुली तालुक्यात आज दिनांक १८ जुलै दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला.त्या पावसामुळे खारतळे गाव या गावातून वाहत असलेल्या कसारी या नाल्याला पुर आला. पुर पहायला गेले असता पाय घसरुन त्यामधे खारतळेगाव येथील दोन तरुन प्रवीन रामराव गुडधे (३४) व निरंजन गुडधे (४०) असे या काका पुतण्याचे नाव असुन नाल्यात आलेल्या पुरात वाहत गेले. या घटनेची माहीती खारतळेगाव येथील सरपंच रुपेश कळसकर यांनी तहसीलदार व तलाठी यांना दिली. माहीती मिळताच तहसीलदार, तलाठी तसेच राज्य राखीव पोलीस दल (गट क्र.९)अमरावती घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य व शोध मोही haveम सुरु असताना आज दि.१९जुलै सोमवार रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमाराला दोघांचेही मृत्यदेह खारतळेगाव या गावापासून एक ते दीड किलो मीटर अंतरावर एका शेतात आढळले. वलगाव पोलिसांनी मृतदेहाचे पंचनामे करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवीन्यात आले .