Home परभणी शेख इरफान शेख शब्बीर ला मारणाऱ्या दारव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून...

शेख इरफान शेख शब्बीर ला मारणाऱ्या दारव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा A.I.M.I.M पालम

265

पालम/प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने पालम तहसीलदार मार्फत गृहमंत्रीयांना निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद केले की,शेख इरफान शेख शब्बीर वय 32 वर्षे रा.रेल्वेस्टेशन, दारव्हा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ हे आपल्या दोन मित्रांसह दैनिक कामाकरिता घराबाहेर गेले असताना दिनांक 06/07/2021 रोजी दारव्हा पोलिसांनी सदर तिन्ही व्यक्तीविरुद्ध कोणतीही तक्रार गुन्हा दाखल नसतानापकडून पोलीस स्टेशन दारवा येथे नेले व अमानुष रित्या बेदम मारहाण केली.पोलीस कर्मचारी दानवे जमादार, सचिन जाधव, संजय मोहतुरे, शब्बीर बाप्पुवाले यांनी इरफान यास लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत शेख इरफान याच्या पोलिस स्टेशन दारव्हा मध्ये मृत्यू झाला.उपचाराच्या देखावा निर्माण करण्यासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतकाची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच दिनांक 06 जुलै 2021 रोजी मूर्त का विरोधात दारव्हा पोलीस स्टेशन डायरी वर गुन्हा व तक्रार नसतांना मूतकास दारव्हा पोलिसांनी लक्ष करून का जीवे मारले? मृतक हा अत्यंत गरीब कुटुंबाच्या सदस्य आहे.तसेच आपल्या परिवारातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने संपूर्ण परिवार आधारहीन झाले आहे.म्हणून या निवेदनाद्वारे AIMIM पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
दारव्हा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी दानवे जमादार,सचिन जाधव,संजय मोहतुरे,शब्बीर पाप्पुवाले,यांना सेवेतून बडतर्फ करून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
2) मृतकाच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत म्हणून 20 लक्ष रुपये त्वरीत देण्यात यावे‌.
3) सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एम.आय.एम पालम शाखेच्या वतीने एम.आय.एमचे तालुकाध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांच्या नेतृत्वात दिलीप वळसे पाटील साहेब गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनावर एम आय एम चे तालुकाध्यक्ष अनिस भाई खुरेशी, हाफिजआसिफ खुरेशी, हाफेज उबैद साहब, सय्यद रहीम, अन्वर खान, शेख खमर, सादात खान, युनुस कुरेशी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत