रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील रहिवाशी हेमंत इच्छाराम भंगाळे वय.२४यास अवैधरित्या दोन हजार रु किमतीची लोखंडी तलवार कब्जात बाळगतांना मिळून आल्याने त्यास निंभोरा पोलिसांनी तलवार सहित ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द पो.कां जाकिर पिंजारी यांनी फिर्याद दिल्यावरून गु र नं ९७/२१ आर्म ॲक्ट ४/२५,व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),(३)चे उल्लंघन केल्याने कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाई स.पो.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अन्वर तडवी,पो.काॅ.सादिक शेख,पो.काॅ स्वप्निल पाटील,संदीप पाटील,यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अन्वर तडवी करीत आहे.