Home पश्चिम महाराष्ट्र सद्गुरू श्री मनोहर मामांचा जन्मोउत्सव उत्सहात

सद्गुरू श्री मनोहर मामांचा जन्मोउत्सव उत्सहात

133

पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्या दैवत श्री.संत बाळूमामा यांचे निस्सीम भक्त , महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि भारताबाहेरील अस्ट्रोलिया, अमेरिका, आणि इतर देशातील तसेच राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र उंदरगाव येथिल सद्गु्रू श्री मनोहरमामा यांचा जन्मोउत्सव हडपसर, मांजरी बु. येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे उत्साहात पार पडला. गेले दोन वर्ष देशाला करोना सारख्या महामारी ग्रसले आहे त्यामुळे सदगुरूनी देशाची सेवा म्हणुन गेले सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात, रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण तसेच वृक्ष वाटप करत आणि ‘बाळूमामांच्या नावानं चांगभल’ , ” मनोहरमामा नावान चांगभलं” जयघोष करीत सद्गुरू श्री मनोहरमामा यांचा जन्मोउत्सव उत्सहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन *विश्व वारकरी चिंतन संप्रदाय* च्या माध्यमातून केले होते.
यावेळी मामांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिरूर, वाल्हेकरवाडी (पिंपरी चिंचवड)आणि हडपसर, मांजरी बु.येथे रक्तदान शिबिरे आणि वृक्षा रोपण तसेच वृक्ष वाटप आयोजित केली होती. विश्व वारकरी चिंतन संप्रदायच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र,दैनंदिन वापररातील अतिशय उपयुक्त असे किट भेट म्हणून दिले होते. प्रत्येक रक्तदात्यास आणि येणाऱ्या साधकास संप्रदायच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सर्व ठिकाणचे मिळून जवळपास २५०० बाटल्या रक्तसंकलन यावेळी झाले. सदगुरू मनोहरमामा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कैवल्यचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अतिथीगृहाचे इंद्रायणी नदी तिराकडील भिंतीवर “विठू माझा लेकुरवाळा ” हे भव्यदिव्य भिंतीचित्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकल्पनेतून व शिवतेज मित्र मंडळ आळंदी देवाची यांच्या सौजन्याने साकारण्यात आले तसेच ओमशांती बालगृह आश्रम या ठिकाणी अन्नदान करण्यात आले.जन्मदिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शन घेतले याप्रसंगी मामांनी प्रवचन करून भक्तांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही गोष्टी साधकांना सांगून प्रत्येक व्यक्ती मध्ये देव असतो तो आपण शोधला पाहिजे , माणसाने माणसाशी प्रमाणे आणि आपुलकीने वागले पाहिजे अशी शिकवण दिली. तर भक्त्तानी सुद्धा ‘बाळूमामांच्या नावानं चांगभल’ , ” मनोहरमामा नावान चांगभलं” जयघोष करीत सद्गुरू मनोहरमामा यांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले. या प्रसंगी आजी माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस अधिकारी, वकील, पत्रकार, समाजसेवक , बिल्डर , नामवंत,विचारवंत, चित्रपट अभिनेते, कलाकार तसेच सर्व विश्व वारकरी चिंतन संप्रदाय प्रमुख, पदाधिकारी, सेवेकरी आणि भक्तगण आदी उपस्थित होते.