Home बुलडाणा ब्रिज कोर्स ची पुस्तके वर्कबुक स्वरूपात छापून विद्यार्थ्यांना द्या-अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक...

ब्रिज कोर्स ची पुस्तके वर्कबुक स्वरूपात छापून विद्यार्थ्यांना द्या-अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

161

सैय्यद तौसीफ. – सिंदखेड राजा

कोरोना मुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांचा झालेला शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अत्यंत चांगल्या संकल्पनेने प्रत्येक वर्ग आणि विषयाच्या 45 दिवसांच्या ब्रिज कोर्स (सेतू अभ्यासक्रम) ची निर्मिती महाराष्ट्र शासन स्तरावरून करण्यात आलेली आहे. या बद्दल शासन व संपूर्ण राज्य स्तरीय शिक्षण व्यवस्थेचे अभिनंदन करत हा ब्रिज कोर्स पुन्हा काही प्रमाणात कमी व सोपा करून याची पुस्तके वर्कबुक स्वरूपात छापून विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांच्या कडे केली आहे. सध्या शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके घरपोच दिल्यास विद्यार्थी आपापल्या घरी राहून सुद्धा त्यातील स्वाध्याय पूर्ण करू शकतात. तसेच जेंव्हा शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील तेंव्हा मागील वर्षाचे व चालू वर्षाचे ब्रिज कोर्स शिकविल्यास या चालू वर्षातच दोन वर्षांचा अभ्यासक्रम चांगल्याप्रकारे शिकविला जाऊ शकतो म्हणून विद्यार्थ्यांना ही पुस्तके देणे अधिक सोईचे व आवश्यक आहे असे निवेदनात म्हटलेले आहे.
तसेच या वर्षी काही विषयांची ब्रिज कोर्सची पुस्तके उशिरा प्राप्त झालेली असल्याने सध्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने ब्रिज कोर्स शिकविण्याबाबत कोर्स पूर्ण करण्यासाठी व चाचण्या घेण्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी राज्य अध्यक्ष मुहम्मद हनीफ, राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा आणि राज्य प्रवक्ता जावेद खान यांनी केली आहे.