Home विदर्भ मांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”

मांगुळ मध्ये बाप लेकाचा गळफासाने मृत्यू , ” गावात हळहळ”

1018

 

देवानंद जाधव

यवतमाळ – ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत मांगुळ कारखाना येथे गुरुवारी राञी अकरा वाजताचे दरम्यान चिमुरड्या लेकरां सह बापाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. संजय शिवाजी ऊईके, वय २९ आणि संयोग संजय ऊईके वय वर्षे ३ असे मृतक बाप लेकराचे नाव आहे.
मागील वर्षी मृतक संजयचा संदीप नामक मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता हे विशेष.
तेव्हा पासुन ऊईके परिवार दुःखाच्या सावटाखाली जगत होते. अशा वेदनादायी मानसिकतेत संजयची पत्नी हवापालट साठी माहेरी गेली होती.
नुकतेच संजयने मुलगा संयोग याला सासुरवाडी वरुन आणले होते. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री चे सुमारास वडील संजय यांनी मुलगा संयोग याला गळफास देऊन, स्वत;गळफास घेतला असावा असा कयास बांधला जात आहे. माञ संजयने गळफास घेतलेल्या जागी पायाजवळ रक्तचा थारोळा दिसत असल्याने, गावभर विविध चर्चेला उधाण आले आहे. एंकदरीत एक खाता पिता उध्वस्त झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी बाप लेकांचा पंचनामा करून दोन्ही प्रेत शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविले आहे.
पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे.