घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी लाेकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्या खासदार निधीतुन घनसावंगी मतदार संघातील जनतेसाठी नविन अद्यावत रुग्णवाहिकेचा लाेकार्पन साेहळा आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय घनसांवगी येथे शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.हिकमत उढाण यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी खा.जाधव यांचे पीए अंगद अंबुरे , शिवसेना घनसावंगी तालुकाप्रमुख उद्धव मरकड, संभाजी सागडे,किशोर मुन्नेमाणीक, सह सर्व पंचायत समिती सदस्य,विभागप्रमुख ,सरपंच सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेना युवासना,साेशलमिडीयाचे पदाधिकारी
शिवसैनिक उपस्थित हाेते.